कोकण

दापोलीतून ८०० टन आंबा कॅनिंगसाठी

CD

वीज कंत्राटी कामगारांचा
काळ्या फिती निषेध
रत्नागिरीः वर्षानुवर्षे ऊन, वादळवारा पावसात सतत राबून जनतेला अखंडित वीजसेवा देणाऱ्या कंत्राटी कामागाराकडे शासन व वीजकंपनी प्रशासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ सर्व वीज कंत्राटी कामगारांनी काळ्या फिती लावून काम केले. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासोबत ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठका घेतल्या; मात्र त्यात दिलेल्या आश्वसनाची पूर्तता अधिकाऱ्यांकडून न झाल्याने कामगार वर्गात तीव्र नाराजी होती. आज तिन्ही वीज कंपनींचा १९वा वर्धापनदिन आहे. वारंवार पत्र देऊनसुद्धा प्रशासन जाणीवपूर्वक व सतत कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतूनच कामगारांनी हा निषेध नोंदवला. सर्व जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनाला प्रतिसाद दिला. आतातरी शासन व प्रशासनाने जागे होऊन कंत्राटी कामगारांना उचित न्याय द्यावा. कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठका घ्याव्यात, अशी अपेक्षा सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली.
------
दापोलीतून ८०० टन
आंबा कॅनिंगसाठी
दाभोळः दापोली तालुक्यामधून ७०० ते ८०० टन आंबा कॅनिंगसाठी गेला असल्याची माहिती आंबा व्यावसायिकांनी दिली. यावर्षी आंबा कमी प्रमाणात आला तसेच कर्नाटकी आंबा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जात आहे. त्याचबरोबर फळगळ, रोग, वादळी वारे, पाऊस, माकडांचा त्रास यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. कर्नाटकी आंबा कमी दरात देवगड हापूस, रत्नागिरी या नावाने विकल्याने बागायतदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. यावर्षी वातावरणातील बदलामुळे आंबा उशिराने आला. त्यामुळे वाशी बाजारसमितीत जाणारा आंबापेटीचा मुहूर्तही हुकला. योग्य दर मिळत नसल्याचे मत आंबा बागायतदारांनी व्यक्त केले. त्यामुळे आंबा कॅनिंगसाठी दापोलीतून पाठविण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना अनेक शेतकऱ्यांनी किलोवर आंबा विकला. यावर्षी तालुक्यातून ७०० टन आंबा व कॅनिंगसाठी पाठवण्यात आला.
-------------
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण
संघातर्फे जाहीर आवाहन
रत्नागिरीः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कर्‍हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील ज्या विद्यार्थ्यांना विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश मिळाले आहे अशा विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी गुणवत्ता पारितोषिके दिली जातात. यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ८० टक्केपेक्षा जास्त व बारावीमध्ये ७५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी संघाकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत त्याचप्रमाणे कर्‍हाडे ब्राह्मण ज्ञातीतील आठवीपासून पुढील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी कर्‍हाडे ब्राह्मण संघात उपलब्ध असणाऱ्या विहित नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे. यासाठी रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मणसंघ, शेरेनाका- झाडगाव, रत्नागिरी या पत्त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज द्यावेत, असे आवाहन संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे.
----
डाकघर कार्यालयात
१३ ला पेन्शन अदालत
पावसः रत्नागिरी येथील अधीक्षक डाकघर विभागीय कार्यालयामार्फत १३ जूनला सकाळी अकरा वाजता विभागीय डाक कार्यालय येथे जिल्हास्तरीय पेन्शन अदालत आयोजित केली आहे. सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रारअर्ज करावा. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी ज्यांचा तीन महिन्यांत निपटारा झालेला नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाईल. अर्ज एन. टी. कुरळपकर, डाकघर अधीक्षक, विभागीय कार्यालय, रत्नागिरी ४१५६१२ यांच्या नावे दहा जूनपर्यंत पाठवावेत.
--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT