कोकण

-वाशिष्ठीत तरुण बुडाल्याने धावाधाव

CD

-rat८p३०.jpg-
२४M८८८६१
चिपळूण ः वाशिष्ठी नदीत बुडणाऱ्या तरुणाला वाचवतानाचे प्रात्यक्षिक करताना पोलिस.
-rat८p३१.jpg-
P२४M८८८६२
चिपळूण ः पोलिसांना बचावकार्यासंदर्भात महत्वाच्या सूचना देताना उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे.
----------

वाशिष्ठीत तरुण बुडाल्याने धावाधाव

पोलिसांचे मॉकड्रिल; आपत्तीकाळातील मदतीबाबत जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः साधारण सकाळी पावणेबाराची वेळ, वाशिष्ठी नदीत एक तरुण बुडत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एकच धावाधाव झाली. वाचवा, वाचवा अशा त्याच्या आर्त हाकेने नागरिकही गोंधळून गेले. काय करावे कोणालाच सूचत नव्हते. मदतीसाठी नागरिकांनीही टाहो फोडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने खाकीवर्दीतील ‌देवदुत‌ांनी वाशिष्ठीकडे धाव घेतली. एका बोटीचा आधार घेत या पोलिसांनी बचावसाधनांच्या साह्याने त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढत बुडताना वाचवले. मदतकार्याचा हा थरारक प्रसंग डोळ्यांदेखत पाहताना नागरिकांच्याही अंगावर शहारे आले; मात्र आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पोलिसांचा हा ‌‘मॉकड्रिल‌’ होता हे कळताच सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शनिवारी सकाळी ११.४० ते दुपारी १२.३० या वेळेत शहरातील गोवळकोट धक्का येथे वाशिष्ठी नदीमध्ये पोलिसांनी हे मॉकड्रिल केले. नैसर्गिक आपत्तीकाळात आपणही मदतकार्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी दाखवून दिले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे व सर्व सहकारी तसेच महिला पोलिसांनी हा उपक्रम राबवला. पोलिसांनी वाशिष्ठी नदीत बुडणाऱ्या व्यक्तीला कसे वाचवावे, कशाप्रकारे मदतकार्य करावे याबाबत जनजागृती केली. गोवळकोट धक्का येथे यासाठी आवश्यक बोटी, बचावसाहित्य उपलब्ध करून ठेवण्यात आले होते. स्थानिक नागरिकांनीही या बचावकार्यात सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT