कोकण

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून पांढऱ्या समुद्रकिनारी वाळू चोरी

CD

८८९०८


पांढऱ्या समुद्रकिनारी राजरोस वाळूची चोरी
महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतर धावपळ ः दोन संशयितांचा शोध, खड्ड्यांमुळे धोका
रत्नागिरी, ता. ८ : शहरातील पांढऱ्या समुद्रकिनारी बंदर प्राधिकरणाच्या जागेत अनेक दिवसांपासून वाळूचे राजरोस उत्खनन होत आहे. शहरामध्ये संपूर्ण शासकीय यंत्रणांच्या नाकावर टिच्चून हा वाळू चोरीचा प्रकार सुरू आहे; परंतु प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे. उपजिल्हाधिकारी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची धावपळ झाली असून तहसीलदारांनी मंडल अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
शुक्रवारी (ता. ७) मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. त्या किनारी भागाचे मोबाईलवर शूटिंग करत असताना वाळू माफियांचा गैरसमज झाला. आपलेच शूटिंग सुरू असल्याचा समज करून त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचे स्पष्ट झाले. तेथील किनाऱ्यावर वाळू उपशामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे किनाऱ्यालाही धोका उद्‍भवण्याची शक्यता आहे.
गेडाम यांनी हल्लेखोरांना अद्दल घडवली असली तरी या प्रकाराकडे प्रशासनाने तेवढ्या गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत; पण गेल्या अनेक दिवसांपासून येथील अवैध वाळू उत्खननाकडे प्रशासनाने दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.
पांढरा समुद्र ते मिऱ्या किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा उभारला जात आहे. जेणेकरून समुद्राच्या उधाणापासून किनाऱ्याची धूप थांबावी; मात्र दुसरीकडे वाळू उत्खनन करून चोरी केली जात आहे. बंदर प्राधिकरण आणि वन विभागाच्या अखत्यारितील या भागाकडे दुर्लक्ष झाल्याने वाळू उत्खननामुळे किनाऱ्यावर मोठे खड्डे पडले आहेत. कोणत्या यंत्रणेच्या आशीर्वादाने वाळू चोरी सुरू आहे, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.

कोट

पांढरा समुद्र येथील अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी वाळू चोरांवर कारवाई करण्याचे आदेश मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- राजाराम म्हात्रे, तहसीलदार, रत्नागिरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT