कोकण

पावस - गावखडीकिनारीचा पिवळा तवंग निरूपयोगी

CD

८८९९८

गावखडी समुद्रकिनारी पिवळ्यारंगाचा तवंग

धोकादायक नसल्याने वेगवेगळ्या चर्चेला पूर्णविराम

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १० ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर पिवळ्या रंगाचा तवंग आला आहे. मच्छीमारी अथवा कोणत्याही इतर गोष्टीसाठी किनाऱ्यावरती आलेला हा तवंग धोकादायक नसून उधाणाच्या भरतीमुळे अशा प्रकारचा तवंग अथवा डांबराचे गोळे येत असतात.
समुद्रामध्ये मच्छीमारी बोटी पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला साफसफाई अथवा बोटिंगची दुरुस्ती करत असताना त्या माध्यमातून वापरण्यात येणारे ऑइल त्याचबरोबर इतर गोष्टींचा वापर केला जातो. ते करत असताना पाण्यात सांडल्यामुळे त्याचा तवंग त्याचबरोबर काळे ऑइल डांबराच्या रूपाने उधाणाच्या भरतीमुळे समुद्रकिनारी दिसत असते. त्याचा मच्छीमारी अथवा कोणत्याही गोष्टीला त्रास होत नाही. या संदर्भात गावखडी पोलिसपाटील बिर्जे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दरवर्षी अमावस्येच्या दरम्याने उधाणाची भरती येते. समुद्र आपल्या पोटामध्ये काही ठेवत नसल्यामुळे तो उधाणाच्या भरतीच्यावेळी समुद्रकिनाऱ्यावरती पाठवत असतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना वाटते की, काहीतरी रसायन काही कंपन्यांनी सोडले आहे की काय? दरवर्षी असा प्रकार घडत असतो. कारण, समुद्रामध्ये अनेक मोठमोठ्या मच्छीमार बोटी कार्यरत असतात. त्या माध्यमातून समुद्रात कुठेही काही बोटीच्या संदर्भात काही घडले अथवा काही टाकले ते या उधाणाच्या भरतीच्या माध्यमातून किनाऱ्यावर येते.

मच्छीमारांत भीतीचे वातावरण
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर पिवळ्या रंगाचा तवंग आला आहे. हा तवंग म्हणजे मोठ्या बोटीतील हे रसासयन सोडण्यात आले आहे का? की बोट नादुरुस्त झाली आहे का? पाण्यातील हा तवंग आरोग्यासाठी आणि माशांसाठी घातक असू शकेल का? असे विविध प्रश्न, शंकाकुशंका मच्छीमारांच्या मनात येत होत्या. मात्र त्याचे कारण स्पष्ट झाल्याने त्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

'कोणी गद्दारी केली, तर पक्षातून हकालपट्टी करणार'; चंद्रशेखर बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना गर्भित इशारा

SCROLL FOR NEXT