कोकण

पट टिकवण्यासाठी शिक्षकांची चढाओढ

CD

पट टिकवण्यासाठी शिक्षकांची चढाओढ

जिल्हा परीषद ; नासा व इस्त्रो दौऱ्याने सकारात्मक दृष्टी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः जिल्हा परीषद शाळा १५ जून रोजी सुरू होत आहेत. त्यामुळे शाळांचा पट टिकवण्यासाठी शिक्षकांची चढाओढ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी मिळवण्यासाठी शोधाशोध सुरू असून शाळेतील शिक्षक गावामध्ये प्रत्यक्ष भेटी देत आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांना शाळेच्या विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खासगी शाळेतील शिक्षकांना तर प्रत्येकी ठरावीक विद्यार्थी संख्येची जबाबदारी दिलेली असते. या परिस्थितीत खासगी संस्था व इंग्रजी माध्यमांच्या शाळा या दोन्ही संस्थांची जिल्हा परीषद शाळेच्या शिक्षकांना विद्यार्थी मिळवावे लागत आहेत. त्यासाठी शाळांकडून वेगवेगळे फंडे वापरण्यात येत आहेत. सर्वच तालुक्यात शालेय उपक्रम यशस्वी होताना दिसत आहेत. पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असल्यामुळे शिक्षकांना त्यांना पटवून द्यावे लागते. हेच मोठे आव्हान घेऊन शिक्षक गावागावात पोचतात. गेल्या दीड ते दोन वर्षात जिल्हापरिषदेच्या काही शाळांमध्ये पट संख्येत वाढ झालेली आहे. परंतू शहरी भागाशेजारील शाळांचा पट घटलेला आहे. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना पालकांचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान सगळीकडेच आहे. गेल्या दोन वर्षात नासा, इस्त्रो दौऱ्याचा यशस्वी उपक्रम राबवीत जिल्हा परीषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचा फायदा भविष्यात शाळा प्रवेशासाठी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT