कोकण

प्रत्‍येकाने वृक्ष लागवडीचा संकल्‍प करावा

CD

89218

प्रत्‍येकाने वृक्ष लागवडीचा संकल्‍प करावा

डी.पी. तानावडे : कणकवलीत वृक्षारोपण

कणकवली, ता.१० : रस्ते, महामार्ग, गृहसंकुले आदींची उभारणी करताना हजारो, लाखो वृक्षांची कत्तल होत आहे. याचा थेट परिणाम निसर्गावर होत आहे. त्‍यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्‍येकाने वृक्ष लागवडीचा संकल्‍प करून प्रत्‍यक्षात कृती करावी, असे आवाहन नगरवाचनालयाचे सह कार्यवाह डी.पी.तानावडे यांनी केले.
राज्‍य शासनाच्या वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत येथील नगरवाचनालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी श्री. तानावडे बोलत होते. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, वैयजंती करंदीकर, प्रशांत राणे, विनोद जाधव, वाचनालयाचे कर्मचारी पूजा मांणगावकर, चेतना आचार्य आदी उपस्थित होते. तानावडे म्‍हणाले, ‘‘ग्लोबल वार्मिंगमुळे दुष्काळ पडणे, अतिवृष्टी होणे, अवकाळी पाऊस पडणे, तापमान वाढ अशी परिस्थिती उद्भवत आहे. निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून वृक्षांची तोड थांबविणे गरजेचे आहे. याकरिता समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा.’’ यावेळी उपस्थितांनी नगरवाचनालयाच्या परिसरात विविध जातींचे वृक्षारोपण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT