कोकण

पान एक-नशिब बलवत्तर होते म्हणून...

CD

89283
तिलारी ः तिलारी घाटातील संरक्षक कठड्यावर चढलेली मोटार. (छायाचित्र ः संदेश देसाई) 


तिलारी घाटात मोटार
दरीत कोसळण्यापासून वाचली
दाट धुक्यामुळे अपघात; मोटार थेट कठड्यावर

सकाळ वृत्तसेवा 
दोडामार्ग, ता. १० ः तिलारी घाटातील दाट धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटार थेट संरक्षक कठड्यावर चढली. चालकाचे व मोटारातील माणसांचं नशीब इतकं बलवत्तर की मोटार खोल दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचली. ही घटना रविवारी (ता.९) मध्यरात्री घडली.
गोव्यातील काहीजण आपल्या आलिशान मोटारीने रविवारी मध्यरात्री तिलारी घाटातून प्रवास करीत होते. मोटार घाट माथ्यावरून गोव्याच्या दिशेने निघाली होती. रात्रीच्या दरम्यान पाऊसदेखील जोरात कोसळत होता. पावसामुळे घाटात दाट धुके होते. त्यामुळे गाडी चालविणे जोखमीचे होते. धुक्यामुळे चालकास घाटातील अवघड वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे मोटार थेट संरक्षक कठड्यावर चढली. मोटारीचा मध्यभाग कठड्यावर स्थिरावल्याचे मोटारीची दोन्ही चाके अधांतरी राहिली आणि मोटार कठड्यावर अडकून राहिली. चाके कठड्यावर राहिली असती, तर मात्र मोटार थेट दरीत कोसळून अनर्थ घडला असता. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोटार दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली. अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी मोटारीचे मोठे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT