कोकण

सावंत यांना ''एसआरटी'' शेतकरी सन्मान

CD

swt116.jpg
89349
रायगडः रामचंद्र सावंत यांना ‘एसआरटी’ शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

सावंत यांना ‘एसआरटी’ शेतकरी सन्मान
रायगडमध्ये पुरस्कार प्रदानः सगुणा फाउंडेशनचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ः गिरगाव (ता. कुडाळ) येथील रामचंद्र उर्फ नाना सावंत यांना ‘एसआरटी’ शेतकरी सन्मान पुरस्काराने रायगड येथे डॉ. मनीषा कायंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
रायगड येथे सगुणा बाग नेरळ, सगुणा फाउंडेशन तसेच एस. आर. टी. (सगुणा सरल रिजनरेटिव्ह) अंतर्गत शेतकरी सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. रायगड येथे स्वतंत्र सैनिक हरीकाका भडसावळे जयंती दिनानिमित्त एस. आर. टी. शेतकरी सन्मान सोहळा कार्यक्रम झाला. यामध्ये सिंधुदुर्ग येथील प्रगतशील युवा शेतकरी रामचंद्र सावंत यांना डॉ. मनीषा कायंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. रोख पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
सावंत हे मागील पाच-सहा वर्षांपासून एसआरटी पद्धतीने शेती करत आहेत. यामध्ये खरीप हंगामात भात, रब्बी हंगामात भुईमूग-चवळी आणि उन्हाळी शेती, पालेभाज्या ही पिके यशस्वीपणे घेतली आहेत. लाल तांदूळ (रक्तहित) पीक लावणी देखील केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल एसआरटी संस्थेच्या वतीने कृषी सन्मान देऊन सावंत यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजीव खांडेकर, डॉ. मनीषा कायंदे (महाराष्ट्र विधान परिषद सदस्या) सगुणा सरल रिजनरेटिव्ह टेक्निकलचे जनक कृषिरत्न पुरस्कार विजेते व ''सगुणा बाग''चे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोकण विभागीय स्तरावरील निवड झालेल्या १५ शेतकऱ्यांना एस.आर.टी. शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवा प्रगतशील शेतकरी रामचंद्र सावंत यांना मानाचा एस.आर.टी. शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे कृषी अधिकारी व शेतकरी बांधवांकडून कौतुक करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT