कोकण

चढ्या दराने स्वराज्य प्रतिमा खरेदीचा आग्रह कोणाचा

CD

- ratchl११३.jpg-
OP२४M८९४५६
चिपळूण ः गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी.
-------------------
वाढीव दराने प्रतिमा खरेदीचा आग्रह कोणाचा?

राष्ट्रवादीचे बीडीओंना निवेदन; कडक कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः ग्रामपंचायतीत शिव स्वराज्य दिन साजरा करताना स्वराज्य प्रतिमा चढ्या दराने खरेदी करण्याचा धाक दाखविण्यात आला. स्थनिक बाजारपेठेत ५०० ते १ हजार रुपये दराने मिळणाऱ्या प्रतिमा ४ हजार रुपये दराने घेण्यात आल्या. ग्रामपंचायतींनी या प्रतिमा खरेदी करण्याचा आग्रह कोणी केला, याची सखोल चौकशी करावी. लाखोंचा गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्याचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
चिपळूण पंचायत समिती आणि तालुक्यातील ग्रामपंचायतीत शिव स्वराज्य दिन साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करताना स्वराज्य प्रतिमा एकाच विक्रेत्याकडून खरेदी करण्यासाठी पंचायत समितीने ग्रामपंचायतींना बंधनकारक केले. स्थानिक बाजारपेठेत ५०० ते १ हजार रुपयांना मिळणाऱ्या स्वराज्य प्रतिमा ४ हजार रुपये दराने घेण्यासाठी दबावतंत्राचे धोरण वापरण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर चिपळूण तालुक्यात लाखोंचा गैरव्यवहार झाला आहे. ते तालुक्यासह जिल्ह्याला शोभनीय नाही. स्वराज्य प्रतिमा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात का ठेवण्यात आल्या, ग्रामपंचायतींना एकाच ठिकाणाहून खरेदी करण्याची जबरदस्ती कोणी केली, किती ग्रामपंचायतींनी ४ हजार रुपये दराने या प्रतिमा खरेदी केल्या, याची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांच्याकडे केली. या निवेदनाची दखल न घेतल्यास शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, महिला तालुकाध्यक्षा राधा शिंदे, रतन पवार, शहराध्यक्ष डॉ. रेहमत जबले, ओबीसी तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, कार्याध्यक्षा अंजली कदम आदी उपस्थित होते.
------------
कोट
ग्रामपंचायतींनी शिव स्वराज्य प्रतिमा खरेदी करण्याबाबत पंचायत समितीचा कोणताही संबंध नाही. याबाबत पंचायत समितीने कोणतीही निविदा प्रक्रिया राबवलेली नाही. ग्रामपंचायतींनी स्वतःहून स्वराज्य प्रतिमा विकणाऱ्या विक्रेत्यांशी संपर्क साधला. त्याची गुणवत्ता चांगली वाटल्याने काही ग्रामपंचायतींनी तेथून खरेदी केल्या. एकाच विक्रेत्याकडून ग्रामपंचायतींनी खरेदी करण्याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांनी लेखी अथवा तोंडी आदेश दिलेले नाहीत.

- उमा घार्गे पाटील, गटविकास अधिकारी, चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT