कोकण

सावंतवाडी ‘अर्बन’चे विलिनीकरण अटळ

CD

सावंतवाडी ‘अर्बन’चे
विलिनीकरण अटळ

‘टीजेएसबी’ बॅंकेचा पर्याय ः सर्वसाधारण सभेत होणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः ‘आरबीआय’ने निर्बंध लादल्यानंतर काहीशी अडचणीत आलेली सावंतवाडी अर्बन बँकेच्या विलिनीकरणाबाबत जोरात हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाणे येथील ‘टीजेएसबी’ या सहकारी बँकेत सावंतवाडी अर्बनचे विलिनीकरण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात टीजेएसबी बँकेची सर्वसाधारण सभा २१ जूनला होणार असून, यावेळी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
सावंतवाडी अर्बन बँकेमध्ये जिल्हाभरात हजाराहून अधिक सभासद आहेत, आतापर्यंतच्या सहकारी बँकेमध्ये सावंतवाडी अर्बन बँक सर्वांत जुनी म्हणून ओळखली जाते. सावंतवाडी तालुक्यासह जिल्हाभरात या बँकेने अल्पावधीत चांगली भरारी घेतली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात बँकेला काहीशी उतरती कळा लागली. यातच बँकेकडे भांडवलाचे पर्याप्त साधन नसल्यामुळे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट ३५ अन्वये निर्बंध लादले होते. त्यामुळे बँक काहीशी अडचणीत आली होती. त्यानंतर संचालक मंडळाने बँकेतील प्रत्येक ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास बँक कटिबद्ध असल्याचे सांगितले होते. शिवाय या निर्बंधातून बाहेर पडण्यासाठी साडेतीन कोटीचे भाग भांडवल जमा करण्याचा निर्धार करत दीड कोटींहून अधिक भाग भांडवल जमा केले होते; मात्र असे असूनही बँकेवरील निर्बंध उठले नाहीत. त्यामुळे आता बँकेचे विलिनीकरण करण्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत.
ठाणे येथील टीजीएसबी सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याबाबत नोटीस प्रसिद्ध झाली असून, या पार्श्वभूमीवर टीजीएसबी सहकारी बँकेने २१ जूनला सावंतवाडी अर्बन बँक आणि आणखी अन्य एक बँक टीजीएसबी बँकेत विलिन करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
----
...तर तशी नोटीस प्रसिद्ध
दरम्यान, याबाबत अर्बन बँकेचे चेअरमन अॅड. सुभाष पणदूरकर व तज्ज्ञ संचालक तानाजी वाडकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘टीजीएसबी बँकेच्या सर्वसाधारण सभेप्रमाणे अर्बन बँकेचीही सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत बँक विलिनीकरण करण्याबाबत निर्णय होऊन तशा प्रकारची नोटीसही प्रसिद्ध देण्यात येणार आहे. ही सभा लवकरच घेण्यात येणार असून, जवळपास महिन्याभराच्या कालावधीमध्ये अर्बन बँक विलिनीकरण प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.’’
---
कर्मचाऱ्यांची नव्याने भरती होणार
श्री. वाडकर म्हणाले, ‘‘ठाणे येथील टीजीएसबी ही सहकारी क्षेत्रात काम करणारी देशभरातील पाचव्या क्रमांकावरील बँक आहे. त्यामुळे या ठिकाणी अर्बन बँकेच्या ठेवीदारांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. सद्यस्थितीत आहे त्याच कर्मचाऱ्यांमार्फत हे काम सुरू होणार आहे. त्यानंतर कर्मचारीही नव्याने भरती होणार आहेत. एकूणच सहकार क्षेत्रातील चांगल्या सुविधा देणारी बँक या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT