89509
तळाशील खाडीत बुडालेल्या
मच्छीमाराचा ड्रोनद्वारे शोध
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : तळाशील येथे खाडीपात्रात शनिवारी (ता. ८) रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छीमाराचा आज पोलिस प्रशासनाच्यावतीने ड्रोनच्या सहाय्याने सर्जेकोट ते तळाशील या परिसरात शोध घेण्यात आला. तीन दिवस उलटून गेले तरी त्यांचा शोध लागलेला नाही.
जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सोमवारी (ता. १०) सर्जेकोट येथे दाखल होत शोध मोहिमेचा आढावा घेतला. दोन दिवस उलटले तरी बेपत्ता मच्छिमाराचा शोध न लागल्याने कोस्टगार्डला माहिती देण्यात आली. त्यानुसार हेलिकॉप्टरद्वारे शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र किशोर यांचा शोध लागला नाही. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी शोध मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच प्रशासकीय अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. आजच्या तिसऱ्या दिवशीही खाडीपात्रात शोध सुरू होता. पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून ड्रोनच्या साहाय्याने सर्जेकोट ते तळाशील या भागात आज शोध मोहीम राबविण्यात आली; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. या शोध मोहिमेत पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर कांदळगावकर, सूरज रेडकर यांच्यासह स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.