कोकण

अवधूत अनंत बामना दिल्ली आकाशवाणीची टॉप ग्रेड

CD

८९७९७

अवधूत अनंत बामना दिल्ली आकाशवाणीची टॉप ग्रेड
पंडित उपाधी मिळालेले कोकणातील पहिले कलाकार
सकाळवृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ः आकाशवाणीचे सेवानिवृत्त कलाकार अवधूत अनंत बाम यांना दिल्ली आकाशवाणी केंद्राकडून सन्मानपूर्वक टॉप ग्रेड प्रदान करण्यात आली. यामुळे आता संगीतक्षेत्रात पंडित अवधूत अनंत बाम अशी ओळख निर्माण झाली आहे. ‘पंडित’ ही उपाधी मिळालेले अवधूत अनंत बाम हे कोकणातील एकमेव टॉप ग्रेड संगीतकार आहेत.
लहानपणापासून संगीत विषयाचा छंद असल्याने १९७८ ते १९९५ पर्यंत अस्थायी कलाकार होते. त्यानंतर १९९५ ते २०१९ पर्यंत आकाशवाणी सेवेत रूजू होऊन आकाशवाणी रत्नागिरीच्या संगीत विभागात त्यांनी आपले योगदान दिले. १९७८ पासून आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा संगीत विभाग सुरू झाल्यापासून A ग्रेड सुगम संगीत गायक, तबलावादक आणि आता टॉप ग्रेड संगीतकार होण्याचा मान अवधूत बाम यांना मिळाला आहे.
अवधूत बाम यांची (कै.) पंडित स्नेहल भाटकर आणि (कै.) पंडित परशुरामबुवा पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगितिक वाटचाल सुरू झाली. संगीतकार म्हणून नवनवीन चाली बांधताना पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. पंडित अवधूत बाम यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

SCROLL FOR NEXT