कोकण

रस्त्यात पडलेले झाड विद्यार्थ्यांनी तोडले

CD

rat१p८.jpg -
P२४M९३९८७
राजापूर ः रस्त्यामध्ये पडलेले झाड तोडताना विद्यार्थी.

रस्त्यात पडलेले झाड विद्यार्थ्यांनी तोडले

ओणी-दसूर येथील प्रकार; सामाजिक बांधिलकीचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः तालुक्यातील वडवली येथील श्रीमती उमाताई शरद परूळकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ओणी-दसूर मार्गावर मागील आठवड्यामध्ये पडलेले झाड तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
मागील आठवड्यात ओणी-दसूर रस्त्यावर आकेशिया जातीचे झाड पाऊसवाऱ्‍यामुळे पडले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची स्थिती निर्माण झाली होती. ही बाब या प्रशालेच्या विद्यार्थी व शिक्षकवर्गाच्या लक्षात येताच त्यांनी रस्त्यामध्ये पडलेले झाडे तोडून रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता स्वत: पुढाकार घेतला. त्यामध्ये झाडाच्या फांद्या तोडून ते झाड मार्गावरून बाजूला करत रस्ता मोकळा केला. यासाठी श्रीमती उमाताई शरद परूळकर माध्यमिक विद्यालय, वडवली प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश साखळकर, शिक्षक विलास शिंदे, व्यंकट नालापल्ले, पंकज जाधव, प्रभात मेस्त्री, दीपेंद्र आमटे, लिपिक निनाद भोसले, चंद्रकांत सावंत यांच्यासह विद्यार्थी अथर्व मटकर, आयुष मटकर, विराज गितये, मयुरेश पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. यापूर्वीही वडवली दत्तमंदिरजवळ पडलेले काजूचे झाड विद्यार्थ्यांनी बाजूला केले होते. रस्त्यामध्ये पडलेले झाड तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या विद्यार्थ्यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

वाहनचालकांतून समाधान
ओणी-दसूर मार्गावर झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. मात्र येथील श्रीमीत उमाताई परूळकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत हे झाड बाजूला करून वाहतुकीतील अडथळा दूर केला. याबद्दल वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT