कोकण

आंबेड बुद्रुकमध्ये विविध रोपांचे वाटप

CD

आंबेड बुद्रुकमध्ये
विविध रोपांचे वाटप
संगमेश्वरः संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत आंबेडबुद्रुकचे सरपंच सुहास मायंगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कृषिदिनाचे औचित्य साधून आंबेड बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विविध रोपांचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच सुहास मायंगडे, उपसरपंच शोएब भाटकर, ग्रामपंचायत सदस्य संचिता पाचकळे, ममता कानर, काशिनाथ कानर, सुरेश किंजळे, पूजा मोहिते, राजेश आंबेकर, साक्षी शिगवण, नुपुरा मुळ्ये, पोलिस पाटील सुनील शिगवण आदी उपस्थित होते. कानरकोंड, मानसकोंड, आंबेडबुद्रुक, दाभलवाडी आदी शाळेतील विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. सरपंच सुहास मायंगडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या रोपांची लागवड केल्यानंतर पाच महिन्यानंतर त्याचे सर्वेक्षण करून चांगल्या पद्धतीने संगोपन करणाऱ्यांना ग्रामपंचायतीच्यावतीने बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच कृषिदिनाचे औचित्य साधून गावातील विविध वाड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तसेच वृक्षदिंडीही काढण्यात आली.
-------
देवरूख पाध्ये शाळेत
रोबोटिक्स प्रयोगशाळा
साडवली ः देवरूख येथील पाध्ये इंग्रजी माध्यम शाळेत रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. पुण्याच्या स्कायरोबोटिक्स या कंपनीच्या सहकार्याने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे यंत्रमानव बनवणे, त्याचे कोडिंग करणे आदी शास्त्र पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. सहस्रबुद्धे यांनी शाळेमध्ये आधुनिक प्रयोगशाळा उभारल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी अशा प्रयोगशाळांच्या माध्यमातून विकसित भारताचे स्वप्न भावी पिढ्या साकार करतील, असा विश्वास व्यक्त केला. उद्घाटन समारंभाआधी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते शहीद जवान स्मारकामध्ये हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन पूर्वा चव्हाण यांनी केले. राजेंद्र राजवाडे यांनी आभार मानले.
------
94224

सरपंच संघटना
अध्यक्षपदी कदम
साडवलीः संगमेश्वर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी हातीवचे सरपंच नंदकुमार कदम यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी ऋतुजा कदम यांची निवड झाली. नूतन कार्यकारिणीत सचिव प्रदीप शिंदे, अमर सावंत, सहसचिव शर्वरी वेल्ले, खजिनदार तन्वी गानू, सल्लागार चंद्रकांत फणसे, संतोष जाधव, संदेश घाडगे, संदेश घेवडे तसेच सदस्य म्हणून राजेश ब्रीद, निधी पंदरे, आरोही रावण, शेखर उकार्डे, सहदेव विठ्ठल सुवरे, विनोद पवार, मनोहर जाधव, राजू पवार, दिलीप गोवळकर यांची निवड झाली. सल्लागार म्हणून संचिता कोळेकर, संतोष काणेकर, संतोष जाधव यांची निवड झाली.
-------------

लाडकी बहीण योजनेची
टाकेडे गावी जनजागृती
मंडणगडः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतुन साकारलेली योजना बहीण माझी लाडकी या योजनेचे गावागावातून कौतुक होत असून, त्याचाच एक भाग या योजनेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी शिवसेना महिला आघाडी संघटक अमिता शिंदे यांनी टाकेडे गावातील महिलांना एकत्र करुन योजनेची माहिती दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या महिलांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. अनंत शिंदे यांनी सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. प्रथमदर्शनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी टाकेडे गावातील एकूण २६ महिलांची यादी तयार केली आहे. त्याचप्रमाणे प्रतिवर्षी ३ सिलेंडर महिलांना मोफत मिळणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला. टाकेडे येथे आयोजित सभेस ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सीताराम सुर्वे, सदाशिव कदम, मारूती गणवे, उत्कर्ष महिला मंडळ टाकेडेच्या अध्यक्षा प्रियांका साळुखे, सचिव संजिवनी चाळके व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
-----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT