कोकण

लांजा - वीरगाव येथे उभारणार नवे वीज उपकेंद्र

CD

वीरगाव येथे उभारणार नवे वीज उपकेंद्र
लांजावासियांचा प्रश्न सुटणार; अजित यशवंतरावांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३ः गेल्या अनेक दिवसांपासून लांजा शहरात अपुऱ्या दाबाने होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारीवर्ग त्रस्त आहेत. विजेच्या सतत होणाऱ्या लपंडावातून कायमची उपाययोजना करण्यासाठी लांजातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित यशवंतराव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेऊन निवेदन सादर केले. तातडीने उपमुख्यमंत्री यांनी महावितरणच्या संबधित अधिकाऱ्यांना वीरगाव येथे उपकेंद्र उभारणीचे निर्देश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी महावितरणच्या लांजा येथील कार्यालयात अजित यशवंतराव यांनी धडक देत महावितरणला जाब विचारला होता. या वेळी लांजा शहरातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना म्हणून लांजा तालुक्यातील उपळे-वीरगाव या ठिकाणचे विद्युत उपकेंद्र तातडीने उभारण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी तातडीने महावितरणाच्या संबंधित विभागाला उपकेंद्र उभारा, असे निर्देश दिले. त्यांच्या आदेशानुसार राज्य विद्युत वितरण कंपनीचे संचालक (ऑपरेशन्स) अरविंद भडीकर यांची भेट घेऊन आरडीएसएस योजनेंतर्गत उपळे-वीरगाव विद्युत उपकेंद्र तातडीने उभारा, अशी मागणी यशवंतराव यांनी केली होती. महावितरण विभागाने वीरगाव या ठिकाणी ३३/११ केव्हीचे नवीन उपकेंद्र प्रस्तावित केले असल्याचे पत्र दिले आहे तसेच उपकेंद्रासाठी आवश्यक निधीही प्राप्त झाल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT