कोकण

सिंधुदुर्ग महाविद्यालयात राजर्षी शाहूंना अभिवादन

CD

सिंधुदुर्ग महाविद्यालयात
राजर्षी शाहूंना अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये जिमखाना विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना १५०व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. हंबीरराव चौगुले, प्रा. के. के. राबते, डॉ. डी. व्ही. हारगीले, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. उज्वला सामंत, डॉ. एम. आर. खोत, प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. प्रमोद खरात आदी उपस्थित होते. जिमखाना विभाग प्रमुख डॉ. चौगुले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल आढावा घेतला. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था मुलांचे वसतिग्रह, कोल्हापुरात स्थापन केलेली व्यापार पेठ, उद्योगांना दिलेली चालना, शाहू मिलची स्थापना, कुस्ती या खेळासाठी स्थापन केलेले खासबाग मैदान, शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी राधानगरी धरणाची बांधणी या गोष्टींचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांनी घडविलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बदलांची माहिती दिली. प्रा. राबते यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हारगीले यांनी आभार मानले.
94349

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Handore Son Arrested : काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला अटक! शुगर वाढल्याने रुग्णालयात केलं दाखल

Tanush Kotian, मुंबईचा तारणहार अन् ‘खडूस’ खेळाडू! टीम इंडियाचा भविष्यातील R Ashwin

Pune Crime : इनशर्ट नाही म्हणून... पुण्यात शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारलं; मुलाच्या कान अन् नाकातून आलं रक्त

जिनिलियाने सासूबाईंबरोबर केली नवरात्रीची पूजा ! देशमुखांच्या सुनांचं होतंय कौतुक

Latest Marathi News Live Updates: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असणारे नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

SCROLL FOR NEXT