कोकण

सिंधुदुर्ग महाविद्यालयात ''कॅम्पस प्लेसमेंट'' उपक्रम

CD

सिंधुदुर्ग महाविद्यालयात
‘कॅम्पस प्लेसमेंट’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात आजवर अनेकवेळा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले होते. त्यामध्ये मुख्यत्वे बाहेरील संस्था आणि कंपन्यांचा समावेश होता. मालवण परिसरातील पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिकांनी सिंधुदुर्ग महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट करण्याचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी दिली.
येथील रापण रिसॉर्टच्या दोन नवीन हॉटेल प्रोजेक्टसाठी सिंधुदुर्ग महाविद्यालयाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन सोमवारी (ता. १) केले होते. प्राचार्य डॉ. ठाकूर, प्लेसमेंट ऑफिसर संग्रामसिंह पवार, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. एम. आर. खोत आणि रापण रिसॉर्ट्सचे भूषण साटम, प्रसाद आचरेकर यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. डॉ. नाईक यांनी स्वागत केले आणि प्लेसमेंट ड्राईव्हच्या स्वरुपाची संकल्पना स्पष्ट केली. साटम यांनी उमेदवारांना जॉब प्रोफाइलची सविस्तर माहिती दिली. मालवणमधील पर्यटन व्यावसायिकांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सदैव तत्पर राहील. व्यावसायिकांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हसाठी पुढाकार घ्यावा. आजी, माजी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट करिअरसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. ठाकूर यांनी यावेळी केले. प्रा. पवार यांनी आभार मानले. या प्लेसमेंट ड्राईव्हमधून सोशल मीडिया मॅनेजर आणि लॉजिस्टिक्स मॅनेजर या पदांसाठी दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. करिअरच्या सुरुवातीस चांगली संधी प्राप्त झाल्याचे मत प्रा. पवार यांनी व्यक्त केले.
94360

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT