कोकण

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

CD

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास
१५ जुलैपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी ः भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील २०२३-२४ करिता अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयांतील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करण्यात येते की, जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील, असे पत्रकात नमूद आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीसाठी या कार्यालयाकडे वेळेवर वर्ग करण्याबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्यांनी तत्काळ कार्यवाही करावी. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नूतनीकरणाबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT