कोकण

लिपिक सुनील डांगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

CD

फोटो ओळी
-rat3p27.jpg-
रत्नागिरी : परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरात लिपिक सुनील डांगे व सौ. डांगे यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक विनोद नारकर, प्रकाश कदम व शिक्षिका.


लिपिक सुनील डांगे यांचा
सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
रत्नागिरी, ता. ३ : येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचे लिपिक सुनील डांगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाळा व संस्थेने हृद्य सत्कार केला. याप्रसंगी मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी सांगितले, डांगे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा शाळेला खूप उपयोग झाला. डांगे यांनी संस्थेच्या विविध विभागांमध्ये ४० वर्षे सेवा केली. खासगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघाच्या रत्नागिरी शाखेत गेली २० वर्षे सचिव पदावर कार्यरत आहेत. हातखंबा डांगेवाडी येथील श्री जम्बुकेश्वर देवस्थान कमिटी मंडळ येथे २५ वर्षे अध्यक्ष व श्रीदेवी रांभोळकरीन येथे ५ वर्षे अध्यक्ष आहेत. त्यांना कारकिर्दीत राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्कार आणि आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन, तसेच नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट यांच्यामार्फत आंतरराज्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. डांगे यांनी संस्थेचे आद्य संस्थापक गुरुवर्य (कै.) फाटक यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमाला सौ. डांगे यांच्यासह दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा सुमिता भावे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दाक्षायणी बोपर्डीकर, सहसचिव शेखर लेले, सदस्य शेखर शेट्ये, व्यवस्थापक पद्मश्री आठल्ये, शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT