कोकण

छत्रपती शाहूंच्या विचारांचा वारसा जपा

CD

९४६१४

छत्रपती शाहूंच्या विचारांचा वारसा जपा
सगुण जाधव ः ओरोस येथे निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून कोल्हापूर संस्थानात दुर्बल वंचित उपेक्षित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या. त्याची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला असणे आवश्यक आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासूया, असे प्रतिपादन बार्टीचे समतादूत सगुण जाधव यांनी श्री पुष्पसेन कॉलेज ऑफ फार्मसी, ओरोस येथे केले.
सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय संमेलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्याची सांगता श्री पुष्पसेन कॉलेज ऑफ फार्मसी ओरोस येथे करण्यात आली. यावेळी श्री. जाधव बोलत होते.
याप्रसंगी इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूपतसेन सावंत, संचालक नूतन परब, समाजकल्याण अधिकारी सुनील बागुल, संतोष परुळेकर, रवी जाधव, बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम, कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, स्काऊट-गाईडचे अधिकारी गायकवाड, सुजित जाधव, सुहास मोचेमाडकर, राजू दिनदयाळ, संग्राम कासले आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेते नीता सावंत, सानिका वायंगणकर, राजन जाधव, संजय तांबे यांना रोख रक्कम, चषक देऊन सन्मानित केले. सामाजिक न्याय विभागाचे सुनील बागुल यांनी शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भूपतसेन सावंत यांनी सामाजिक न्याय विभाग व बार्टीचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. नूतन परब यांनी अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन शाळा, महाविद्यालयांत होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले. आभार विजय कदम यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT