कोकण

माझी लाडकी बहीण योजना घरोघरी पोहचविणार

CD

माझी लाडकी बहीण योजना
घरोघरी पोहचविणारः शेट्ये
भाजप कार्यकर्ते सज्ज असल्याची ग्वाही
साडवली, ता. ३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकारने राज्यातील माता-भगिनींसाठी मुख्यमंत्री ''माझी लाडकी बहीण'' ही कल्याणकारी अभूतपूर्व योजना आणली आहे. ही योजना घरोघरी पोहचविण्यासाठी भाजपा कार्यकर्ते सज्ज असल्याची माहिती भाजप ओबीसी सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी दिली.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या, निराधार अशा सर्व महिलांच्या खात्यावर दरमहा दीड हजार रुपये जमा होणार आहेत. लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असणे गरजेचे आहे. केशरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांनी या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला जोडायची आवश्यकता नाही. लाभार्थी महिला महाराष्ट्राची नागरिक असणं अपेक्षित आहे. त्याकरिता अधिवास दाखला, जन्मदाखला, पंधरा वर्षे जुने रेशनकार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही एक पुरावा जोडणे अपेक्षित आहे. ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेचा अर्ज करू शकता, अशी माहिती भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT