कोकण

निवृत्त ग्रामसेवकांच्या प्रलंबित समस्या सोडवा

CD

निवृत्त ग्रामसेवकांच्या
प्रलंबित समस्या सोडवा

महासंघाचे सीईओंना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या विविध समस्या प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग स्थापनेचे अधिकृत पत्र व मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आले. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), (ग्रामपंचायत विभाग), मुख्यलेखा वित्त विभाग अधिकारी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामविकास यंत्रणा यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश राणे, उपाध्यक्ष हनुमंत प्रभू, सचिव प्रकाश राणे, कोषाध्यक्ष राजाराम जाधव, पदाधिकारी अंकुश मुणगेकर, भास्कर केरवडेकर, विठ्ठल वाटवे, नाऊ बेडेकर, रामा ठाकूर, दीपक मर्गज, श्री. हरमलकर, श्री. शिरसाट, संजय गावडे, ए. व्ही. साटम, आदी उपस्थित होते.
94739

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT