कोकण

‘लायन्स’तर्फे सावंतवाडीत विविध उपक्रम

CD

‘लायन्स’तर्फे सावंतवाडीत विविध उपक्रम

अमेय पै ः सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः सावंतवाडी लायन्स क्लब सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून, या वर्षात मेडिकल एड सेंटर, नेत्र शस्त्रक्रिया, पर्यावरण, युथ अवेरनेस असे विविध समाजहिताचे उपक्रम राबविणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष अमेय पै व सेक्रेटरी अभिजीत पणदूरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
रिजन चेअरमन गजानन नाईक यांनी प्रास्ताविक केले. सावंतवाडी लायन्स क्लबची स्थापना १९७५ मध्ये झाली. क्लब आता ५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या वर्षासाठी लायन्स क्लबची नूतन कार्यकारिणी निवडली असून, अध्यक्षपदी अमेय पै आणि सेक्रेटरीपदी अॅड. अभिजीत पणदूरकर, खजिनदारपदी सुनील दळवी यांची निवड करण्यात आली, असे त्यांनी जाहीर केले. येत्या वर्षात लायन्स क्लबच्या प्रांतपालांच्या ॲक्शन प्लाननुसार विविध समाजहिताचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
लायन्स क्लबतर्फे आरोंदा येथे मेडिकल एड सेंटर, हॉस्पिटलसारखा मोठा उपक्रम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गरीब रुग्णांची नेत्र चिकित्सा आणि आवश्यक असल्यास नेत्र शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांच्या हिताचे विविध उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरे, महिला व युवतींसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पर्यावरणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व जोपासना आदी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पै यांनी दिली. पत्रकार परिषदेला क्लबचे संचालक रविकांत सावंत, संदेश परब, महेश पाटील, बाळासाहेब बोर्डेकर आदी उपस्थित होते. लायन्स क्लबच्या नूतन कार्यकारिणीचा पदाधिकार ग्रहण आणि दीक्षांत सोहळा शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी साडेसहा वाजता भगवती सभागृह रेल्वेस्टेशन रोड मळगाव येथे आयोजित केला आहे. लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल सुनील सुतार आणि ॲड. विजय जमदग्नी प्रमुख पाहुणे आणि दीक्षा अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
94742

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT