कोकण

बापूसाहेब महाराज लोककल्याणकारी राजे

CD

बापूसाहेब महाराज लोककल्याणकारी राजे

डॉ. जी. ए. बुवा ः सावंतवाडीत ‘खेमराजीय’ अंकाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज लोककल्याणकारी राजा होते. सावंतवाडी शहरामध्ये डास निर्मूलन मोहीम, गावागावांमध्ये रस्ते, अनेक शाळाही त्यांनी सुरू केल्या. महात्मा गांधीनी त्यांना ‘रामराजा’ असे संबोधिले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना ‘न्यायप्रिय राजा’ अशी उपाधी दिली, असे गौरवोद्गार डॉ. जी. ए. बुवा यांनी काढले.
सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती हिज हायनेस श्रीमंत पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८७ वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये झाली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोसले, प्रमुख अतिथी डॉ. जी. ए. बुवा, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर, संस्था व राजघराण्यावर प्रेम करणारे नागरिक अण्णा केसरकर, प्रा. अन्वर खान, अॅड. नकुल पार्सेकर, सुरेश गवस, माजी सभापती भगवान देसाई, प्रेमानंद देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा सावंत, काका मांजरेकर, मंगेश तळवणेकर आदी उपस्थित होते. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. भारमल यांनी महाविद्यालयाचा गेल्या वर्षीचा प्रगतीचा आढावा घेतला. श्री पंचम खेमराज महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठांतर्गत स्वायत्त दर्जा मिळालेले कॉलेज असून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ येथे २०२३-२४ राबविल्याचे त्यांनी सांगितले. मराठी कनिष्ठ विभागाचे प्रा. माधव भिसे यांनी बापूसाहेब महाराजांच्या जीवनावर चिंतन केले.
राजमाता सत्वशिलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच मदर क्विन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचा वार्षिक ‘खेमराजीय’ अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. जी. ए. बुवा यांनी पुण्यश्लोक बापूसाहेबांच्या जीवनातील विविध घटनांचा उल्लेख केला. त्यांचे आध्यात्मिक गुरू साटम महाराज यांच्याशी निगडीत प्रसंग कथन केले. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या रुपाने त्यांचे हे शैक्षणिक स्मारक १९६१ मध्ये त्यांचे चिरंजीव श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी उभारले व त्यांची आजची पिढीही त्याच आस्थेने व पूर्ण क्षमतेने या स्मारकाची जोपासना करीत आहेत, असे सांगितले. प्रा. पूनम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. उमेश पवार यांनी आभार मानले.
94813

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT