कोकण

रत्नागिरी-पाच महिन्यात दीड कोटींची दंडात्मक कारवाई

CD

जिल्हा वाहतूक पोलिस ... लोगो

पाच महिन्यात दीड कोटींचा दंड वसूल
२३ हजार वाहनधारकांवर कारवाई; ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची एकच केस
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जिल्हा वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करत गेल्या ५ महिन्यात २३ हजार ३२९ प्रकरणे दाखल करण्यात आली. यातून १ कोटी ५६ लाख ५९ हजार २०० इतका दंड वसूल केला आहे; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईत ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचे केवळ एकच प्रकरण दाखल झाले आहे.
पुण्यामध्ये भरधाव मोटारीने दुचाकीवरील दोघांना उडवले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हा मोटारचालक दारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले होते. यानंतर राज्यभरात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. जिल्ह्याचा विचार करता वाहतूक पोलिसांकडूनही कठोर कारवाई करण्यासंबंधीची पावले उचलण्यात आली. १ जानेवारी ते ३१ मे २०२४ या दरम्यानच्या काळातील समोर आलेल्या आकडेवारीत मोठी दंडात्मक कारवाई झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार विनाहेल्मेटच्या ४१२ केसेस असून, २ लाख ६ हजार दंडाची कारवाई केली. वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या ५ हजार ५१ केसेस असून, १६ लाख ७० हजार ५०० रुपयांच्या आर्थिक दंडाची कारवाई केली. वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या ५ हजार ५१ केसेस केल्या. त्यामध्ये १६ लाख ७० हजाराचा दंड वसूल केला. सिग्नल तोडल्याचे १५६ प्रकार समोर आले आहेत. फॅन्सी नंबरप्लेटच्या ८६८ केसेस असून, ५ लाख २२ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली तर विनापरवाना वाहन चालवल्याप्रकरणी ३५ जणांवर कारवाई केली असून, सुमारे ९ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. नो पार्किंगच्या २२, विना सीटबेल्टच्या २ हजार ३००, काळ्या फिल्मच्या काचा लावणे, ट्रीपल सीट दुचाकी चालवणे आदीवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

चौकट...
प्रकार केसेस दंड
विनाहेल्मेट ४१२ २,०६,०००
विना सीटबेल्ट २,३०० ४,६०,०००
मोबाईलचा वापर ११३ १,३५,०००
सिग्नल तोडणे १५६ ८२,०००
वाहनांचा विमा नसणे ११६ २,४०,०००
विनापरवाना ३५ ९,००,०००
फॅन्सी नंबरप्लेट ८६८ ५,२२,५००
वाहतुकीस अडथळा ५,०५१ ३२,११, ५००
ट्रीपल सीट ६८१ ६,८१,०००
इतर १३,५९७ ९२,२१,२००
---------------------------------------------------------
एकूण २३,३२९ १,५६,५९,२००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT