कोकण

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ७२०० रुग्णांना लाभ

CD

rat५p१२.jpg -
P२४M९४९२१
सावर्डे - चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील वालावलकर रुग्णालयाची इमारत.

महात्मा फुलेअंतर्गत ७२०० रुग्णांना लाभ

वालावलकर रुग्णालय ठरतेय वरदान ; ६४२ जणांची ‘अँजिओप्लास्टी’

सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ५ : तालुक्यातील सावर्डे येथील वालावलकर रुग्णालय हे कोकणातील जनतेसाठी वरदान ठरत आहे. गेल्या वर्षी ७ हजार २०० हून अधिक रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचा लाभ दिला आहे.

वालावलकर रुग्णालयामध्ये हृदयरोग, कॅथलॅब, मूत्रपिंड आणि डायलिसिस, शस्त्रक्रिया विभागात १२ ऑपरेशन थिएटर्स, मेडिकल सर्जिकल बालरोग नवजात अर्भक, १०० बेडचे अतिदक्षता विभाग, स्वतंत्र कर्करोग विभाग ज्यामध्ये केमोथेरपी, रेडिओ थेरपी, कॅन्सर शस्त्रक्रिया अशा अनेक यंत्रणांनी सज्ज असे अनेक विभाग आहेत. यामध्ये गतवर्षी ६४२ हृदयविकार रुग्णांना अँजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रियेमुळे जीवदान मिळाले आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या कर्करोगांचे ३ हजार ५०० रुग्ण केमोथेरपी योजनेचा लाभ घेत आहेत तर रेडिएशन उपचारपद्धतीचा ३१५ रुग्णांना लाभ झाला आहे तसेच २८०हून अधिक रुग्णांवर कॅन्सर शस्त्रक्रिया केल्या गेल्या. अशाप्रकारे १ हजार ५०० हून अधिक रुग्णांवर विविध प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया केल्या गेल्या.

हे रुग्णालय कोकणातील एकमेव परिपूर्ण अद्ययावत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय असून, यात विविध प्रकारचे ३००हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स येथे कायमस्वरूपी उपलब्ध आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्रीदेखील उपचार करणे सहज शक्य होते. संपूर्ण रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून तर रुग्ण उपचारासाठी येतातच; पण त्याशिवाय कोल्हापूर, सातारा, मुंबई, पुणे इथूनही रुग्ण योग्य उपचाराकरिता हॉस्पिटलला भेट देत आहेत. अनेक रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात त्या वेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच केशरी व पिवळ्या रेशनकार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येतो. योजनेत समाविष्ट रुग्णांचे पूर्ण उपचार तर होतातच तसेच रुग्ण योजनेत समाविष्ट असेपर्यंत जेवणाची मोफत सोयही देण्यात येते. डायलिसिस विभाग ११ हेमोडायलिसिस मशिन्स, आरओ प्लांटने सज्ज असा असून मागील वर्षी ४८० रुग्णांना डायलिसिस सुविधेचा लाभ मिळालेला आहे. रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठीदेखील अनेक योजनेमुळे रुग्णांचे कर्करोग निदान होते आणि निदानासाठी आवश्यक असणाऱ्या तपासण्यांसाठी लागणारा निधी उपलब्ध होऊन लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे रुग्णाचे आयुष्य वाढते. वालावलकर रुग्णालयाच्या रूपाने मॉडर्न वैद्यकीय उपचारपद्धती गोरगरीब रुग्णांच्या दारात त्याच गावात उपलब्ध झाल्यामुळे आता त्यांनाही जगण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.
----------------

कोट...

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व मोफत उपचार दिले जात आहेत. रुग्णालयानेसुद्धा उपचार पूर्ण व्हावेत आणि त्या रुग्णाला जीवदान मिळावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे रुग्णांना जीवदान आणि आरोग्य प्राप्त होत आहे.

-डॉ. सुवर्णा पाटील, संचालिका
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT