कोकण

संक्षिप्त

CD

आंबव महाविद्यालयाचे यश
साडवली ः मुंबई विद्यापीठाच्या बी. फार्मसी अंतिम सेमिस्टर ८चा निकाल लागला. या परीक्षेमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापिठाचा बी. फार्मसीचा एकूण निकाल ८७.८६ टक्के लागला तर महाविद्यालयाचा एकूण निकाल हा ९८.३१ टक्के लागला आहे. आकांक्षा धोत्रे हिने ८.५५ सीजीपीए मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला तर द्वितीय क्रमांक प्रतीक वाडेकर (८.४६), तृतीय क्रमांक वफा नेवरेकर, सिद्धी पाडळकर, अनोमा जाधव (८.३७), चतुर्थ क्रमांक प्रेरणा कळंबटे (८.२८), पाचवा क्रमांक नेहा धुळप, दीपक खेडेकर, सिद्धी सावर्डेकर, सानिका नरवणकर (८.१९) तसेच नायपर जेईई २०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचादेखील निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनी आकांक्षा धोत्रे हिने राष्ट्रीय स्तरावर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राप्त केली आहे.
--------
ratchl५२.jpg ः
P२४M९४९९७
चिपळूण - पंचायत समितीत निवेदन देताना भाजप पदाधिकारी.

विशेष महिला ग्रामसभा लावणे गरजेचे

चिपळूण ः महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दर महिना १५०० रुपये मिळणार आहेत. १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत सर्व कागदपत्रे जमा करून ऑनलाईन फॉर्म भरावयाचे आहेत. चिपळूण तालुक्यातील सर्व गावांतील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची परिपूर्ण माहिती मिळावी तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष महिला ग्रामसभा लागणे गरजेचे आहे. या महिला ग्रामसभेमधून महिलांना परिपूर्ण माहिती मिळेल व जास्तीत जास्त ऑनलाईन फॉर्म भरून या योजनेचा लाभ सर्व घटकांतील महिलांना मिळेल यासाठी गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांना आवाहन करावे यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती चिपळूण यांना भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी निवेदन दिले. सहाय्यक प्रशासन अधिकारी आर. जी. चौरे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा विस्तारक प्रसन्ना जाधव, जिल्हा चिटणीस संतोष मालप, संतोष वरेकर, गणेश हळदे, तालुका उपाध्यक्ष संदीप सुखदरे, ओंकार बापट, तालुका सरचिटणीस एकनाथ सहस्रबुद्धे, बूथप्रमुख राहूल जाधव उपस्थित होते.
..............


डॉ. माधवी साठे यांची
चिपळुणात शोकसभा

चिपळूण ः येथील आम्ही मिळूनी सारे ग्रुपच्यावतीने डॉ. माधवी साठे यांची श्रद्धांजली सभा शनिवारी ६ जुलैला सायंकाळी ५ वा. शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिरच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेतून स्व. डॉ. साठे यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यात येणार आहे. चिपळुणातील सामाजिक, वैद्यकीय, क्रीडा, साहित्यिक क्षेत्रावर डॉ. साठे यांनी आपली वेगळी छाप उमटविली होती. त्या उत्तम जलतरणपटूसुद्धा होत्या. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. या प्रेरणेतूनच त्या विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत होत्या. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, आजच्या युवापिढीला त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती व्हावी यासाठी आम्ही मिळूनी सारे ग्रुपने त्यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे. या वेळी त्यांनी केलेले सामाजिक काम व खेळाडू म्हणून केलेले मार्गदर्शन याचा माहितीपट उलगडण्यात येणार आहे. तरी सर्व मंडळांनी, त्यांच्या मित्र-परिवार यांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रुपच्यावतीने केले आहे.

-----

कामगार कल्याणतर्फे
स्वराभिषेक मैफिल

चिपळूण ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७१व्या वर्धापनदिनानिमित्त चिपळूण गट कार्यालय येथे अनिकेत चव्हाण व सहकारी यांचा स्वरमयी स्वराभिषेक कार्यक्रम रंगला. या मैफलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला घरडा केमिकल्स कंपनीचे जनरल मॅनेजर अनिल भोसले, सीएसआर मॅनेजर बापूराव पवार, कन्साई नेरोलॅक प्रा. लि. चे युनियन अध्यक्ष तुषार घाग, एचआर मॅनेजर नंदन सुर्वे, एमआयडीसीचे उपअभियंता रवीकिरण पिंपळे, सहाय्यक अभियंता रामदास जाधव तसेच गुणवंत कामगार शिवाजी शिंदे, मानसिंग यादव, वसंत चिपळूणकर, दौलत वाळुंज, कंत्राटदार, दीपेश उकिर्डे आदींसह एमआयडीसी आस्थापना अधिकारी, गुणवंत कामगार, सामाजिक कार्यकर्ते, रसिकवर्ग उपस्थित होता. या मैफलीमध्ये अनिकेत चव्हाण, अभिषेक सुतार, प्रणाली पिरदणकर, स्वरा यादव, रवी निगुडकर यांनी बहारदार गीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सर्व कलावंतांचा कामगार कल्याण अधिकारी अरूण लाड यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन रघुनाथ कासेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष नेवरेकर, दीपक गायकवाड, ऋतुजा जोर्वेकर, अक्षता जोशी, ज्योती गाडे, स्नेहा चव्हाण, संगीता सुवार, संस्कृती शिंदे, स्मिता शिंदे, नम्रता खेडेकर यांनी परिश्रम घेतले.
------------

‘घरडा, कन्साई नेरोलॅक’चा सन्मान

चिपळूण ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७१ वा वर्धापनदिन चिपळूण येथे उत्साहात झाला. या वेळी घरडा केमिकल्स कंपनी व कंन्साई नेरोलॅक प्रा. लि. कंपनीच्या आस्थापनेचा सन्मान करण्यात आला. सीएसआर फंडातून घरडा कंपनीने फरशी बसवून दिल्याबद्दल कंपनीचे जनरल मॅनेजर अनिल भोसले व सीएसआर मॅनेजर बापूराव पवार यांचा तसेच कार्यालयाच्या इमारतीला रंगरंगोटी करून दिलेल्या कन्साई नेरोलॅक प्रा. लि. कंपनीचे युनियन अध्यक्ष तुषार घाग व एचआर मॅनेजर नंदन सुर्वे यांचा कामगार कल्याण अधिकारी अरूण लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी एमआयडीसीचे उपअभियंता रवीकिरण पिंपळे, सहाय्यक अभियंता रामदास जाधव, गुणवंत कामगार शिवाजी शिंदे, मानसिंग यादव, वसंत चिपळूणकर, दौलत वाळुंज, कंत्राटदार, दीपेश उकिर्डे, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अरूण लाड यांनी केले.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT