कोकण

पिकविमा योजनेत सहभागी व्हावे

CD

पिकविमा योजनेत सहभागी व्हा

शेतकऱ्यांना आवाहन; ई-पीक पाहणी अॅपवर नोंद

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ६ ः शेतकऱ्यांनी सर्वसमावेशक पिकविमा योजनेत सहभागी होण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी आवाहन केले आहे.
प्रधानमंत्री पिकविमा योजना २०२४ खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये भात व नाचणी या अधिसूचित पिकांसाठी राबवण्यात येत आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात सर्वसमावेशक पिकविमा योजना राबवण्यात येत असून शेतकन्यांनी प्रतिअर्ज केवळ १ रुपया भरून पिकविमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. यासाठी भातपिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी ५० हजार रुपये तर नाचणी पिकासाठी २० हजार रुपये जाहीर करण्यात आली आहे. योजनेचे वैशिष्ट्ये जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात भात व नाचणी या पिकांना विमा संरक्षण देण्यात येईल. कर्जदार शेतकरी व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घेता येईल. या योजनेचा विमा हप्ता भरण्याचा कालावधी १५ जून ते १५ जुलै आहे. विमा अर्ज आपले सरकार सेवा केंद्र (CSC), बॅंक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा. गावातील कृषी साहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा तसेच पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर बंधनकारक असल्याने ई-पीक पाहणी अॅपद्वारे पिकांच्या नोंदी करून घेण्याचे आवाहन जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT