कोकण

राजापूर-ओणीतील हॉस्पिटलच्या जागेची आज पाहणी

CD

-rat६p२१.jpg
95197
राजापूर ः वाटुळ येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीबाबत पालकमंत्री उदय सामंत यांना पंचक्रोशी ग्रामविकास समितीतर्फे निवेदन देताना विश्वास राघव व आदीनाथ कपाळे.


वाटुळ येथील हॉस्पिटलच्या जागेची
आज पालकमंत्री सामंत करणार पाहणी
राजापूर, ता. ६ ः तालुक्यातील वाटुळ येथील प्रस्तावित शासकीय जागेवर सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कार्यवाही सुरू व्हावी, अशी मागणी पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबईच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. तसे निवेदन समितीच्यावतीने सामंत यांना देण्यात आले आहे. पालकमंत्री सामंत रविवारी (ता. ७) जागेची पाहणी करणार आहेत. त्यामुळे या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासंबंधी पालकमंत्री सामंत यांची विधानभवन येथे पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे सचिव विश्वास राघव, प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे, सहसचिव रूपेश चौगुले, सदस्य यशवंत जड्यार आदींनी सामंत यांना निवेदन दिले. वाटुळ येथील शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा आरोग्य विभागास देण्यात यावी यासाठी समितीने प्रयत्न केले. ही जागा सप्टेंबर २०२१ मध्ये बांधकाम विभागाने आरोग्य विभागास वर्ग करण्यात आली आहे. या ठिकाणी रुग्णालयाची उभारणी व्हावी, अशी मागणी पंचक्रोशी ग्रामविकास समितीने केली आहे. सामंत यांनी सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाबाबत मुख्यमंत्री यांची भेट घेऊन अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर वाटुळ येथे सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय होणार आहे. त्या जागेची रविवारी पाहणी करणार असल्याचेही सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT