कोकण

बिलये कुटुंबियांना भाजपकडून मदत

CD

95236

बिलये कुटुंबियांना
भाजपकडून मदत
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ७ः तालुक्यातील कोचरा-रवळनाथवाडी येथील मधुकर उर्फ बंटी प्रदीप बिलये याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बंटी हा एकमेव घरातील कमवता व्यक्ती असल्यामुळे त्या कुटुंबावर आभाळच कोसळले. सध्यस्थितीत त्याची आई, छोटी बहीण व आजी असा परिवार आहे. उत्पन्नाची कोणतीच बाजू नसल्यामुळे या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीकोनातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोख रक्कम जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती नीलेश सामंत, माजी सभापती वंदना किनळेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, सरपंच संघटनेचे विष्णू उर्फ पपू परब, शक्तिकेंद्र प्रमुख नाथा मडवळ, अनुसूचित जाती मोर्चाचे गुरुप्रसाद चव्हाण, आपी फणसेकर, देवदत्त साळगावकर, युवा मोर्चाचे विनीत किनळेकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT