कोकण

महिलांना फणसाच्या पाककृतींचे धडे

CD

95239

महिलांना फणसाच्या पाककृतींचे धडे
कोकण संस्थेचा उपक्रमः गुळदुवेत शिबिरास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ः कोकण संस्थेच्या माध्यमातून गुळदुवे येथे आयोजित केलेल्या फणस प्रक्रिया प्रशिक्षण शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल ४८ महिलांनी सहभाग घेतला. यावेळी कापा व रसाळ फणसापासून पल्प, हलवा, श्रीखंड फणस वेफर्स आदी पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच शैलेंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच अशोक धर्णे, प्रशिक्षिका प्राची धुरी, ग्रामसेवक स्वप्ना बगळे, रुपाली धर्णे, दीपगौरी मामलेकर, राजश्री जोशी, संगीता जोशी, किशोर केदार, भगवान चव्हाण आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामसेविका बगळे यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी प्रास्ताविकामध्ये कोकण संस्थेचे समन्वयक चव्हाण यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
ते म्हणाले, ‘‘कोकणात कापा आणि बरका हे दोन प्रकार आढळतात. या फळझाडाच्या व्यावसायिक लागवडीकडे कुणीच लक्ष दिलेले नाही. मोठ्य़ा प्रमाणावर फणस लागवड झाल्यास कोकणात त्यावर मोठा प्रक्रिया उद्योग उभा राहू शकेल. सध्या बागायती किंवा इतर शेतीसाठी कळीच्या ठरणाऱ्या हवामानातील बदलाचाही या फळझाडावर फारसा परिणाम होत नाही. फणसाच्या आधारावर व्यापक असा प्रक्रिया उद्योग उभा राहू शकतो.’’
प्रशिक्षिका सौ. धुरी यांनी फणसाचे आरोग्याच्या दृष्टीकोनातून आयुर्वेदिक फायदे सांगितले. अनेक दुर्धर आजारांवर फणस हा कसा गुणकारी आहे, हे सांगतानाच त्यांनी पिकलेल्या व कच्च्या फणसापासून खाद्यपदार्थ बनविण्याच्या पाककृती महिलांना सांगितल्या. प्रात्यक्षिक करताना सर्वप्रथम रसाळ फणसाच्या गऱ्यापासून पल्प बनविणे, त्यानंतर त्या पल्पचा वापर करून कराची हलवा व श्रीखंड बनवायला शिकविले. कच्च्या फणसाच्या गऱ्यांपासून वेफर्स कसे बनवावे, याचेही महिलांना धडे दिले. महिलांनी प्रात्यक्षिक करताना उत्स्फूर्त सहभाग घेतला. सरिता शेटकर यांनी आभार मानले. ग्रामसेविका बगळे यांच्या हस्ते उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी सरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यकारिणी, ग्रामसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT