कोकण

विद्यार्थी, शिक्षकांच्या हितासाठी तत्पर

CD

95334

विद्यार्थी, शिक्षकांच्या हितासाठी तत्पर
राजन कोरगावकरः वेंगुर्लेत शिक्षक समितीतर्फे साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ९ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही शिक्षकांच्या हक्कांसाठी लढणारी एकमेव संघटना आहे. शिक्षकांच्या हक्कांसोबत विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविणारी ही अग्रगण्य संघटना आहे, असे प्रतिपादन राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी येथे केले.
शिक्षक समिती शाखा वेंगुर्लेमार्फत दत्तक पालक उपक्रम राबविला जातो. शिक्षक समिती शिलेदारांमार्फत दरवर्षी वेंगुर्ले केंद्रातील १४ केंद्रांमधून ४२ विद्यार्थी दत्तक घेतले जातात. यंदाचे उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. येथील साई मंगल डिलक्स हॉल येथे हा सोहळा झाला. दत्तक पालक उपक्रमासोबतच नव्याने रुजू झालेल्या शिक्षक बंधू-भगिनींचे वेंगुर्ले तालुका शाखेमार्फत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद तालुकाध्यक्ष सीताराम नाईक यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस कोरगावकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर, सचिन मदने, कोकण विभाग सचिव संतोष परब, कोकण विभाग संघटक प्रशांत मडगावकर, जिल्हा शिक्षक नेत्या सुरेखा कदम, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक, वेंगुर्ले संचालक सीताराम लांबर, कुडाळ तालुकाध्यक्ष शशांक आटक, सचिव महेश गावडे, मालवण तालुकाध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड, सचिव नवनाथ भोळे, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण तालुका कार्यकारिणीने मेहनत घेतली. अशाच प्रकारे आणखी उपक्रम ह्या तालुक्यात व्हावेत, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मनाला समाधान वाटले, असे मनोगत गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. चंद्रकांत अणावकर यांनी संघटनेचा इतिहास आणि सद्यस्थिती आपल्या भाषणातून सांगितली. यावेळी ४२ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नव्याने तालुक्यात रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत तालुका शाखेमार्फत करण्यात आले
प्रास्ताविक सीताराम लांबर यांनी, सूत्रसंचालन रामा पोळजी यांनी केले. आभार प्रदर्शन त्रिंबक आजगावकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT