कोकण

कामथे उपजिल्हा रुग्णालयात १२ ला दिव्यांग तपासणी शिबिर

CD

टुडे २

कामथे उपजिल्हा रुग्णालयात
१२ ला दिव्यांगांची तपासणी
चिपळूण : तालुक्यातील कामथे उपजिल्हा शासकीय रुग्णालयात १२ जुलैला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणी शिबिरात अस्थिव्यंग मानसिक, तसेच अंध या संबंधित दिव्यांग तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर फॉर्म भरणे व त्याची पावती घेणे गरजेचे आहे. तसेच आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, जुने प्रमाणपत्र, जुने आजाराचे कागदपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. (शिबिरात ऑनलाईन फॉर्म भरण्यात येणार नाहीत). दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.

ब्राह्मण सहायक संघाचे
शिष्यवृत्तीसाठी आवाहन
चिपळूण : चिपळूणच्या ब्राह्मण सहायक संघाकडून गरजू आणि वार्षिक उत्पन्न कमी असलेल्या पालकांच्या शाळा आणि महाविद्यालात शिक्षण घेत असलेल्या चिपळूणमधील मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी संघाकडे विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावे लागतात. २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षासाठीही संघ शिष्यवृत्ती देणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेले अर्ज संघाच्या कार्यालयात ८ जुलै २०२४ पासून उपलब्ध असतील. अर्ज एक आठवड्याच्या आत पूर्ण भरून कार्यालयाकडे जमा करावेत. माहिती पूर्ण नसेल किंवा विद्यार्थी जेथे शिक्षण घेत आहे त्या संस्थेच्या प्रमुखाची सही नसेल तर संस्था अर्ज नाकारू शकेल. संस्थेत अर्ज मिळण्याचा कालावधी ८ ते २० जुलै असेल. त्यानंतर अर्ज मिळणार नाहीत. पालकांना आपल्या उत्पन्नाचा दाखला अर्जाला जोडावा. चित्पावन संघ मुंबई या संस्थेचे शिष्यवृत्ती अर्ज फक्त कोकणस्थ ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी चिपळूणच्या ब्राह्मण सहायक संघ कार्यालयात उपलब्ध आहेत. ब्राह्मण सभा मुंबई यांच्याकडून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या ब्राह्मण समाजातील सर्व विद्यार्थ्यांसाठी काही दिवसांनी अर्ज उपलब्ध होतील, अशी माहिती ब्राह्मण सहायक संघ कार्यवाह यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT