कोकण

कुडाळ आंबेडकरनगरात पूरस्थिती

CD

कुडाळ आंबेडकरनगरात पूरस्थिती

शेती, पूल पाण्याखाली ः प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः तालुक्याला आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने भंगसाळ नदीला पूर आला. पुराचे पाणी लगतच्या परिसरात पसरले. शहरातील महालक्ष्मी हॉल नजीकचा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरातील घरांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले होते. तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.
शनिवारी (ता. ६) रात्रीपासून मुसळधार पावसामुळे भंगसाळ नदीसह वेताळबांबर्डे हातेरी नदीला पूर आला. माणगाव खोऱ्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आंबेरी येथील जुने पूल पाण्याखाली गेले. तेथे नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. येथील भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी शहरातील महालक्ष्मी हॉल नजीकच्या मुख्य रस्त्यावर दाखल झाले. त्यामुळे सकाळपासून हा मार्ग वाहतुकीस बंद होता. या दिशेला जाणारी वाहतूक उद्यमनगर येथून वळविण्यात आली. नदीकिनारी असलेल्या भातशेतीत पाणी शिरल्याने शेती पाण्याखाली गेली. कुडाळसह पिंगुळी, पावशी, वेताळबांबर्डे व अन्य काही ठिकाणी घरापर्यंत पाणी दाखल झाले होते. तहसीलदार वीरसिंग वसावे, निवासी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन आढावा घेतला. यावेळी नदीकिनारील नागरिकांना खबरदारीच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या.
95448
95449

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT