कोकण

शिक्षण विभागातर्फे बालकांचे सर्वेक्षण

CD

शिक्षण विभागातर्फे
बालकांचे सर्वेक्षण
ओरोसः जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच अंगणवाडी ५ जुलैपासून सेविका, मदतनीस यांच्या मदतीने शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण हाती घेतले आहे. ही मोहीम २० जुलैपर्यंत चालणार आहे. यासाठी बालकांच्या घरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर तसेच स्थलांतरित होऊन येणार्‍या व जाणार्‍या कुटुंबांतून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. माहिती निर्देशानुसार ३ ते १८ वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे दिल्या आहेत.
-----------
''मुख्यमंत्री वयोश्री''
योजनेचा लाभ घ्या''
सिंधुदुर्गः राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी व त्यांच्या वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधणे, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ''मुख्यमंत्री वयोश्री'' योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्ती वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी ''मुख्यमंत्री वयोश्री'' योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी या कार्यालयाशी संपर्क साधावा.
----------
माजी मुख्याध्यापकास
पेन्शनप्रश्नी न्याय
वेंगुर्लेः मी ज्या संस्थेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालो, ती संस्था २०१० पासून आजपर्यंत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय आरोस येथे नोंदणीकृत ‘पीटीआर’वर नाही. त्यामुळे मी माध्यमिक जिल्हाधिकारी यांच्या आदेशपत्राने ३१ मे २०१७ रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झालो आहे; मात्र घटनाबाह्य संचालक मंडळाने अधिकार नसताना खोटे आरोप लावून आपली पेन्शन रोखून धरली होती. गेली सात वर्षे मी ही पेन्शन मिळण्यासाठी लढा देत आहे. अखेर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी हा सर्व विषय समजून घेऊन माझा प्रश्न सोडविला आहे, असे निवृत्त मुख्याध्यापक विनायक गवाणकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. संस्थेच्या संचालकांना सहधर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी अपिलीय अधिकारात घटनाबाह्य व बेकायदेशीर ठरविले आहे, असे असतानाही या अवैध संचालक मंडळाने वेळोवेळी विविध ठिकाणी माझ्या विरोधात खोटी निवेदने देऊन पेन्शन रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र शिक्षक आमदार म्हात्रे यांनी माझी न्याय बाजू समजून घेऊन हा मार्गी लावला, असे गवाणकर यांनी म्हटले आहे.
--------------
ओटवणे, माडखोलला
पूरस्थितीचा फटका
ओटवणेः तेरेखोल नदीसह तिच्या उपनद्यांना आलेल्या महापुराचा माडखोल ओटवणे पंचक्रोशीसह परिसराला फटका बसला. पुराचे पाणी ओटवणे आणि सरमळे गावांतील घरांसह दुकानांमध्ये शिरल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. माडखोल फुगी येथे नदीचे पाणी विविध दुकानांसह घरांमध्ये शिरल्याने बाजारपेठवासीयांची तारांबळ उडाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. पुराचे पाणी सावंतवाडी-बेळगाव या आंतरराज्य महामार्गावर दोन ठिकाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तेरेखोल नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे बांदा-दाणोली या जिल्हा मार्गावर पुराचे पाणी येऊन रविवारी सकाळपासूनच या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. ओटवणे रवळनाथ मंदिरनजीक देऊळवाडीमध्येही तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे मुख्य मार्ग बंद होता. देऊळवाडीतील भिवसेन सोमाजी गावकर आणि रामदास सोमाजी गावकर यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने या दोघांचेही नुकसान झाले.
-----------------
दोडामार्गात २७ ला
राष्ट्रीय लोकअदालत
दोडामार्गः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा समिती, सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशाला अनुसरून दोडामार्ग येथील दिवाणी न्यायालय (क. स्तर) येथे २७ जुलैला सकाळी १० वाजता राष्टीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. दोडामार्ग तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशनतर्फे ही राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. प्रलंबित दिवाणी व फौजदारी आदी प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी ती तालुका विधी सेवा समितीकडे लवकर दाखल करावीत, असे आवाहन येथील दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष वाय. पी. बावकर यांनी केले आहे.
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT