कोकण

-संशयिताच्या गुरांच्या गोठ्यावर छापा

CD

गोवंश हत्या प्रकरण...लोगो

वेताशीतील जनावरांच्या गोठ्यावर छापा

संशयितावर स्वतंत्र गुन्हा; दहा गुरांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः गोवंश हत्येप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताच्या तालुक्यातील वेतोशी येथील गुरांचा गोठ्यावर पोलिसांनी छापा टाकला. काल रात्री उशिरा तपासणी करून गोठ्यातील दहा गुरांची सुटका केली. या प्रकरणी संशयितावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित अन्य जिल्ह्यातील काही लोकांच्या संपर्कात असून त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
संशयित शादाब गनी बलबले (रा. क्रांतीनगर) याच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी मिरजोळे एमआयडीसीतील प्लॉट क्र. ४४ समोर मुख्य रस्त्यावर गोमासाचे अवशेष आढळून आले होते. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांसह हिंदू समाज, भाजप नेते नीलेश राणे आक्रमक झाले होते. गोवंश हत्या करणाऱ्याला ४८ तासात अटक करा, असा इशारा श्री. राणे यांनी दिला होता.

गोवंश हत्याप्रकरणी पोलिसांना संशयित शादाब बलबले याला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. रविवारी रात्रीपासूनच पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. रविवारी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन ढेरे यांनी शादाब बलबले याच्या वेतोशी येथील गोठ्यावर छापा टाकला. तपासणी केली असता गोठ्यात एक गाय, एक म्हैस, आठ बैल, अशी एकूण दहा गुरे आढळून आली. त्यांची राहण्याची, पाणी, चाऱ्याची व्यवस्था योग्य पद्धतीने करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी दहाही गुरांची तेथून सुटका केली. रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून शादाब गनी बलबले याच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शादाबवर आता एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारपर्यंत शादाब पोलिस कोठडीत राहणार आहे.
-------
चेक पोस्ट कार्यान्वित

या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अशा प्रकारे होणारी गोमांस वाहतूक रोखण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यातील सर्व चेक पोस्ट पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT