कोकण

सिंधुदुर्गनगरीत शिक्षकांचे ''धरणे''

CD

95776

सिंधुदुर्गनगरीत शिक्षकांचे धरणे आंदोलन
प्रश्‍नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; बदली प्रक्रिया राबवूनही अद्याप आदेशाची प्रतिक्षाच
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबवूनही अद्याप आदेश दिले नाहीत. आंतरजिल्हा बदली प्राप्त शिक्षकांनाही अद्याप कार्यमुक्त केले नाही. वेळोवेळी लक्ष वेधूनही शिक्षकांच्या प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. विविध घोषणा देत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना शासनाकडून आदेश देऊन जिल्हाअंतर्गत बदलीची संधी दिली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बदल्यांसाठी २१ मे रोजी समुपदेशन प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत काही शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत; मात्र अद्यापही याबाबत आदेश न झाल्याने व अन्य विविध मागण्यांसाठी शिक्षकांना भर पावसात आंदोलन छेडावे लागल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दुपारनंतर शिक्षक संघाच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, सरचिटणीस बाबाजी झेंडे, कार्याध्यक्ष मधुसूदन घोडे, पूनम पालव, श्रावणी सावंत, के. टी. चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य शिक्षक मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. या आंदोलनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन शिक्षकांवर अन्याय करत आहे. यापुढे अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी संघटनेच्यावतीने प्रशासनास देण्यात आला.


चौकट
प्रमुख मागण्या
जिल्हाअंतर्गत बदली आदेश २१ जून २०२३ ची कार्यवाही तातडीने करा.
विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख पदोन्नती तातडीने करा.
आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करा.
गणित, विज्ञान पदवीधर शिक्षकांना नियुक्तीपत्र द्या व वेतन श्रेणी लागू करा.
शून्य पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांची समायोजन करून बदली करा.
नवीन शिक्षकांना नेमणुका द्या. प्रलंबित कामाचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT