कोकण

आंबेगाव-सटवाडीतील पूर्वापार रस्ता खुला करण्याचे आदेश

CD

आंबेगाव-सटवाडीतील पूर्वापार
रस्ता खुला करण्याचे आदेश
तहसीलदारांची शिष्टाईः ग्रामस्थांत समाधान
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ९ ः आंबेगाव-सटवाडी जाणारा पूर्वापार रस्ता बंद केल्याप्रकरणी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून संबंधित रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. हा रस्ता सोमवारी (ता. ८) वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यामुळे सटवाडीतील शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे.
सटवाडीतील एका ग्रामस्थाने एक वर्षांपूर्वी हा रस्ता बंद केला होता. त्यांमुळे शाळकरी मुलांसह ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याबाबत गेले वर्षभर दावा सुरू होता. ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. पाटील यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन हा रस्ता खुला करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सोमवारी रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला. हा रस्ता खुला करण्यासाठी सांवतवाडीचे मंडळ अधिकारी गिरप, तलाठी धोंड तसेच सर्व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचे सहकार्य लाभले. यावेळी पोलिसपाटील गावडे, सरपंच शिवाजी परब, उपसरपंच रमेश गावडे, ग्रामसेवक राऊळ, ग्रामपंचायत सदस्य योगेश गवळी, देवस्थान प्रमुख ज्ञानेश्वर परब, माजी सरपंच नामदेव परब, पांडुरंग परब, लक्ष्मण काळे, कानू शेळके, बबन शेळके, राजू काळे, समीर काळे, संजय जंगले, राजन कोकरे, वाघू कोकरे, संतोष राणे, संजय काळे, धोंडी शेळके, पाडुरंग परब, धाकू शेळके, बाबुराव वरक, सगी झोरे, जनी झोरे, नाथा शेळके, बापू झोरे, सिंधू झोरे, धनश्री जंगले, सावित्री झोरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT