कोकण

कुणकेरी-पाळणेकोंड धरणाचे हायड्रोलिक दरवाजे उघडले

CD

95947

कुणकेरी-पाळणेकोंड धरणाचे
हायड्रोलिक दरवाजे उघडले
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण तुडुंब भरले असून, पालिकेकडून धरणाचे सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडले आहेत. मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी या ठिकाणी भेट देऊन जलपूजन करून धरणाला श्रीफळ अर्पण केले. सावंतवाडी पालिकेच्या मालकीचे कुणकेरी येथे पाळणे कोंड धरण आहे. या धरणावरून सावंतवाडी शहरातील नळधारकांना वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी दशहराला पुरेल एवढा पाणीसाठा धरणामध्ये असतो. वर्षाच्या हंगामातील रविवारी कोसळलेल्या सर्वात मोठ्या पावसातच हे धरण तुडुंब भरून वाहू लागले. शहरासाठी ही आनंदाची गोष्ट असल्याचे मुख्याधिकारी साळुंखे यांनी सांगितले. तुडुंब भरलेल्या धरणाची पाहणी करत धरणाचे सहाय्य हायड्रोलिक दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर जलपूजन करत श्रीफळ अर्पण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT