कोकण

तिल्लोरी कुणबीचे 2808 अर्ज प्रशासनाला सादर

CD

-rat९p३३.jpg-
२४M९५९४५
रत्नागिरी ः उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे तिल्लोरी कुणबी सामाजिक डाटा अर्ज सादर करताना समाजोन्नती संघाचे अध्यक्ष रामभाउ गराटे. सोबत गजानन धनावडे.
-----------
तिल्लोरी कुणबीचे २८०८ अर्ज प्रशासनाला सादर

कुणबी समाजोन्नती संघ ; डाटा संकलनासाठी जिल्हाभर मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः तिल्लोरी कुणबी समाजबांधवांना मागील काही महिन्यांपूर्वी ओबीसी दाखला देण्यात येऊ नये, असे तोंडी आदेश मागासवर्गीय आयोगाने दिल्यामुळे गोंधळ उडाला होता. त्यानंतर तिल्लोरी कुणबी समाजाने डाटा सादर करण्यासाठी जिल्हाभर मोहीम सुरू केली होती. त्यानुसार कुणबी समाजोन्नती संघाच्या रत्नागिरी शाखेने २ हजार ८०८ तिल्लोरी कुणबीचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे सादर केले.
रत्नागिरी जिल्ह्यात मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीत अध्यक्षांनी तिल्लोरी कुणबी असा उल्लेख असलेल्या पुरावाधारक बांधवांना ओबीसी दाखला देऊ नये, असे तोंडी आदेश दिले. त्यामुळे तिल्लोरी कुणबी बांधवांना ओबीसी दाखले मिळणे बंद झाले होते. त्या अनुषंगाने झालेल्या मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी लक्षवेधी बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानुसार शासनस्तरावरून झालेल्या बैठकीत तांत्रिक अडचणीची बाब लक्षात आली होती. इतर मागासवर्ग मंत्री यांना पत्रव्यवहार करून संबंधित अधिकारी व कुणबी समाजाचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक झाली होती. इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील पत्रानुसार जिल्हाभरात तिल्लोरी कुणबी समाजाने सामाजिक डाटा आयोगाकडे सादर करण्यासाठी गावागावात अर्ज मोहीम राबविली होती. त्यानुसार सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सर्वेक्षणाबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडील नमुन्यातील अर्ज भरून माहिती संकलित करण्यात आली. ५ जुलैला कुणबी समाजोन्नती संघाने ९०८ अर्ज जमा केले होते. त्यानंतर ८ जुलैला १९०० डाटा अर्ज जमा केले. रत्नागिरी तालुक्यातून २ हजार ८०८ डाटा अर्ज येथील जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. हे अर्ज देताना अध्यक्ष रामभाऊ गराटे, गजानन धनावडे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT