कोकण

पाट येथील तेली कुटुंबीयांना आमदार नाईकांकडून मदत

CD

96024

पाट येथील तेली कुटुंबीयांना
आमदार नाईकांकडून मदत
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ९ः मुसळधार पावसामुळे पाट-तेलीवाडी येथील रामचंद्र उर्फ बाळू तेली यांचे मातीचे घर कोसळून भुईसपाट झाले. याबाबतची माहिती शिवसेना उपविभागप्रमुख महेश वेळकर यांनी आमदार वैभव नाईक यांनी कळविल्यानंतर त्यांनी तेला यांना तातडीची आर्थिक मदत दिली. तसेच घरकुल योजनेतून प्रस्ताव मंजूर करून सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही दिले.
तेली यांचे घर जमीनदोस्त झाल्याने आमदार नाईक यांच्या सुचनेनुसार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी तेली यांना आर्थिक मदत देऊन आमदार नाईक यांच्या माध्यमातून घरकुल योजनेतून घर देण्याची ग्वाही दिली. यावेळी उपविभागप्रमुख महेश वेळकर, कुडाळ शिवसेना नगरसेवक उदय मांजरेकर, युवा सेनेचे राजू गवंडे, युवा सेनेचे संदेश सावंत, शिवसेना एसटी कामगार संघटना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी शेगले, रामचंद्र तेली, पियुष तेली, गुरू तेली, अक्षय तेली आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT