कोकण

तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देईन

CD

- rat१०p३.jpg-
२४M९६०८७
जळगाव ः मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री गुलाबराव पाटील.

तुमचा वकील बनून न्याय मिळवून देईन

गुलाबराव पाटील ः स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटनेचा जळगावला मेळावा

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनतेसाठी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून गट व समूह समन्वयक कर्मचारी यांना १३ हजाराहून २५ हजार मानधन वाढ करण्यात आली. त्याप्रमाणे तुमचा वकील म्हणून राज्यातील ६१४ गट व समूह समन्वयक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या जळगाव येथील राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी चिपळूणसह जिल्ह्यातील सर्व गट संसाधन केंद्रातील गट समन्वयक व समूह समन्वयक कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानधनवाढ केल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संघटनेचे राज्य अध्यक्ष विलास निकम, सचिव जयंत वर्मा तसेच राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव आणि कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी मंत्री पाटील म्हणाले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना व उपक्रम हे गावपातळीवर यशस्वीपणे राबवण्याचे काम गट समन्वयक, समूह समन्वयक यांनी सक्षमपणे केले आहे. त्यामुळे या विभागाचा नावलौकिक वाढला आहे. येणाऱ्या काही दिवसात आपण सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत सादर करू. राज्यातील सर्व सामान्य कुटुंबातून आलेल्या कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी मंत्री म्हणून नाही तर तुमचा वकील म्हणून भूमिका बजावणार आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT