कोकण

आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य वेदपाठ शाळेत उपनयन विधी

CD

-rat१०p३०.jpg-
P२४M९६२२२
नाणीज : येथील आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य वेदपाठ शाळेत उपनयन विधीमध्ये सहभागी विद्यार्थी.
------------

वेदपाठ शाळेत उपनयन विधी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : तालुक्यातील नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य वेदपाठ शाळेत ६५ मुलांचा उपनयन विधी झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सामाजिक उपक्रमांतर्गत या वेदपाठशाळेची निर्मिती केली आहे. येथे सर्व जातीच्या मुलांसाठी पौरोहित्याचे शिक्षण मोफत उपलब्ध करून दिले आहे.
येथील वेदपाठशाळा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक (नागपूर) या विद्यापिठाशी संलग्नित आहे. हे शिक्षण हे ''हायर डिप्लोमा इन पौरोहित्य'' या कोर्सच्या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना दिले जाते. हे शिक्षण हे दोन वर्षाचे आहे. या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना वसतीगृहाची सुविधा, पाठ्यपुस्तकाची सोय, दोनवेळचे भोजन, वही, पेन व गणवेश या सर्व सोयी संस्थानमार्फत विद्यार्थ्यांना मोफत पुरवल्या जातात.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये पौरोहित्य कोर्समध्ये ६५ मुलांनी प्रवेश घेतला आहे. पाठशाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व पिठाचे उत्तराधिकारी प. पू. कानिफनाथ महाराज यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी सौ. ओमेशोरी ताई उपस्थित होत्या. त्यांनी सर्व मुलांना मार्गदर्शन केले. वेदपाठ शाळेचे अध्यक्ष कुंडलिक वायभासे व प्राचार्य योगेश कुऱ्हाडे, उपप्राचार्य विष्णू उगवेकर यांनी वेदपाठ शाळेच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT