कोकण

-धोकादायक साकवाची तहसीलदारांकडून पाहणी

CD

-rat१०p३२.jpg, rat१०p३३.jpg-
P२४M९६२२४
पावस ः कुर्धे येथील धोकादायक लोखंडी साकवाची पाहणी करताना तहसीलदार राजाराम म्हात्रे, तलाठी मनीषा कदम आदी.
---------
सकाळ बातमीचा परिणाम---लोगो

''त्या’ साकवाची तहसीलदारांकडून पाहणी

कुर्धेतील ग्रामस्थांनी दिली माहिती ; तात्पुरते दोर बांधण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १० ः रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे गावातील नदीवरील लोखंडी साकव धोकादायक झाल्याचे वृत्त बुधवारी (ता. १०) दै. ''सकाळ''मध्ये प्रसिद्ध होताच तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तूस्थिती समजावून घेतली.
कुर्धे गावातील नदीवर येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार, ओंकार अभ्यंकर यांच्या घराजवळ लोखंडी साकव बांधण्यात आला. त्यामुळे खोताचीवाडी, फडकेवाडी आदी परिसरातील शालेय विद्यार्थी यांना प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळाकडे जाण्यासाठी त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी पावसाळ्यामध्ये या लोखंडी साकवाचा चांगला उपयोग होत होता. चार वर्षांपूर्वी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती; परंतु त्यानंतर त्या लोखंडी साकवाचा मधील भाग गंजल्यामुळे मोडकळीस आला आहे. त्यामुळे तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाला आहे. याबाबतचे वृत्त आज ''सकाळ''मध्ये सचित्र प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत तहसीलदार राजाराम म्हात्रे, तलाठी श्रीमती मनीषा कदम, उपसरपंच श्रीमती शिंदे, पोलिस अंमलदार महेश कुबडे यांनी ग्रामस्थांसमवेत पुलाची पाहणी केली आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. सध्या लोखंडी साकवाची तातडीने दुरुस्ती करणे पावसाळ्यामुळे शक्य नसल्याने तात्पुरते चांगल्या प्रकारचे दोर बांधून वाहतूक सुरू राहील या दृष्टीने आदेश देण्यात आले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT