कोकण

जिल्ह्यात उद्योगाना विरोध हाणून पाडणार

CD

-ra१०p३१.jpg-
२४M९६२२३
रत्नागिरी ः जिल्हा भाजपतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना खासदार नारायण राणे.
---------

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार

खासदार नारायण राणे ; उद्योगांना केला जाणारा विरोध हाणून पाडणार, आता जुलूम, मस्ती बंद

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. ११ : जनतेची सेवा करण्यासाठी मी खासदार झालोय उपद्रव करण्यासाठी नाही. आजपर्यंत मी कधी कोणाला मुद्दाम त्रास दिलेला नाही. पण माझ्या लोकांना छेडले तर सोडणार नाही. येत्या ५ वर्षांमध्ये जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. त्यासाठी उद्योग येणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात येणारे उद्योग बंद करायला कोणी आले, तर मी तो विरोध हाणून पाडणार, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला. जिल्हा भाजप (दक्षिण) यांच्यावतीने वि. दा. सावरकर नाट्यगृहात खासदार राणे सत्कार सोहळा व आभार मेळाव्यात ते बोलत होते.
राणे म्हणाले, तुमच्यामुळेच मी खासदार झालो. रत्नागिरीकरांनी केलेला सत्कार अतिशय महत्त्वाचा आहे. आता सत्कार बंद. पाच वर्षात केवळ मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. येथील प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. येथे प्रकल्प आले पाहिजेत. बेरोजगारी दूर झाली तरच रत्नागिरीतील कुटुंबे सधन होतील. त्यातून शैक्षणिक व आरोग्य सुबत्ता येईल. यापुढे रत्नागिरीत जुलूम, मस्ती बंद. अडचणी आल्यास एक फोन करा, खासदार तुमच्या सोबत असेल. माझ्या विजयाचे मानकरी आपण सर्वजण आहात. आजचा सत्कार हा घरातला आहे. कुटुंबात पैसा आला तरच शिक्षण व आरोग्य योग्यप्रकारे मिळू शकते. उत्तम शिक्षणामुळेच तरूणांना चांगल्या नोकरीची संधी मिळेल. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. तुम्हाला लागणारी ताकद द्यायला मी तयार आहे.
यापुढील पाच वर्षात आपल्याला केवळ मतदारसंघाचा विकास करायचा आहे. राजकारण बाजूला करून सर्वांनी कोकण म्हणून एकत्र आले पाहिजे. विकासासाठी कोकणची एकजूट दिसली पाहिजे. रत्नागिरीचे प्रश्न मला चांगले माहीत आहे. मुंबई-गोवा महामार्ग लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. नद्यांचा गाळउपसा, संरक्षक भिंतींची कामे पुढील मे महिन्याच्यापूर्वी पूर्ण होतील. राणे जो शब्द देतात तो पाळतात, हा इतिहास आहे. यापुढे अशीच कामे आपण करणार आहोत. तुम्ही फक्त माझ्या पाठिशी उभे रहा, असे आवाहन खासदार राणे यांनी केले.
या वेळी भाजप नेते नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, भाजप नेत्या उल्का विश्वासराव, ऐश्वर्या जठार, रवींद्र नागरेकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद अधटराव, माजी उपनगराध्यक्ष आशिष खातू, अ‍ॅड. विलास पाटणे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार राणे यांचा सत्कार करण्यात आला.
-----------------

रवींद्र चव्हाण, उदय सामंतांचेही आभार

निवडणूक संपली आपण विजयी झालो. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचाही माझ्या विजयामध्ये मोठा वाटा आहे, असेही खासदार राणे यांनी सांगत उपस्थितांचे आभार मानले.
-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT