कोकण

नैसर्गिक अधिवासात सोडले

CD

- rat११p६.jpg -
२४M९६२९६
साडवली - सर्पमित्र अण्णा बेर्डे आणि मिलिंद जंगम हे जातीवंत साप पकडताना.

सर्पमित्रांनी घरात शिरलेल्या सापाला पकडले

बेर्डे, जंगम यांचे कौतुक ; नैसर्गिक अधिवासात सोडले

साडवली, ता. ११ : मुसळधार पावसात जातीवंत साप भक्ष्याचा पाठलाग करत घरात घुसला. हा प्रकार बेलारी येथील विजय पांचाळ यांच्या घरात मंगळवारी (ता. ९) रात्री घडला. रात्रभर साप किचन रूममध्ये अडकून बसला होता. पहाटे सहा वाजता विजय पांचाळ यांच्या पत्नीने किचनचा दरवाजा उघडताच समोर नागाचे दर्शन झाले. भयभीत होऊन त्यांनी दिवे लावले. नागाला पाहून ताबडतोब त्यांनी पती विजय पांचाळ यांना उठवून हा प्रकार सांगितला. विजय पांचाळ यांनी बंधू संजय पांचाळ, शेजारी अनंत कदम, विजय कदम आणि हुमणे गुरूजी यांना बोलवले. हुमणे गुरूजी यांनी सर्पमित्र माजी नगरसेवक अण्णा बेर्डे यांना बोलावले. किचनमधील अडगळीच्या सामानात तो नाग लपून बसला होता. शेवटी सर्पमित्र अण्णा बेर्डे यांनी मिलिंद जंगम यांच्या मदतीने नागराजाला मोठ्या बरणीमध्ये जेरबंद केले आणि त्याला जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडले. तेव्हा पांचाळ कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT