कोकण

...मृत्यूनंतरही स्मशानभूमीत पोहोचण्याचा मार्ग खडतर

CD

मृत्यूनंतरही स्मशानाचा मार्ग खडतर

देवघर-कर्लीवासियांची व्यथा ; रस्त्याचे काम अर्धवट, गाडी, चारचाकी नेणेही अशक्य

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः जगण्यासाठी इथे रोजच झगडावे लागते; पण मृत्यूनंतरही स्मशानभूमीत पोहोचण्याचा मार्ग ही खडतर परिस्थिती देवघर-कर्ली या ग्रामस्थांची आहे. स्मशानभूमीपर्यंत जाण्याचा रस्ता आराखडा मंजूर झाला आहे; पण तो ठेकेदाराने अर्धवट ठेवला आहे. त्यामुळे रस्त्याअभावी गाडी, हातगाडी, टेम्पो त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. याकडे प्रशासन गांभीर्याने पाहील, अशी आशा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
देवघर या गावामध्ये कमीतकमी आठ ते दहा पिढ्या राहात आहेत. भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा परिसर असल्यामुळे इथे रोजच झगडावे लागत आहे; पण ते झगडणे मृत्यूनंतरही नशिबी येत आहे. गावातील स्मशानभूमीत जाण्यासाठी खडतर मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसाळ्यात तर याहून वाईट परिस्थिती असते. मृत पावणारा ताटीवर किंवा माणसांच्या खांद्यावर झोपलेला अशी स्थिती अनेकवेळा येथील लोकांवर येते. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही; पण तिथे जाण्यासाठी असलेली पायवाटही प्रचंड चढ-उताराची, दगडधोंड्याची आणि झाडाझुडुपांनी भरलेली आहे. गावात वयस्कर लोकाचीच संख्या अधिक आहे. तरुणवर्ग नोकरीधंद्यासाठी गावाबाहेर आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत घरातील व्यक्ती मयत झाली तर मोठा प्रश्‍न निर्माण होतो. रस्त्याअभावी गाडी, हातगाडी, टेम्पो वगैरे तिथे जाऊ शकत नाही.
स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठीचा रस्ता मंजूर आहे; पण ते काम करण्यासाठी नेमलेला ठेकेदार रस्ता अर्धवट सोडून निघून गेला. काही ग्रामस्थांनी त्याचा पाठपुराही केला; परंतु प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. त्यामुळे स्मशानभूमीच्या मंजूर रस्त्याचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी गंगाराम घाणेकर, अनंत घाणेकर, नारायण घाणेकर, धोंडूनाना घाणेकर, प्रदीप जाधव, विनोद जाधव, गिरीश बोंद्रे, आनंद बोंद्रे, अरूण बोंद्रे, रोहन बोंद्रे आणि ग्रामस्थांनी केली आहे.
-----

ओढ्यावर करावे लागतील अंत्यसंस्कार

गावाला पिण्याचे पाणी देण्यासाठी स्मशानभूमीतील वहाळाचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे यंदा मृत व्यक्तीला स्मशानभूमीत नेणे शक्य न झाल्यास अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळच्या ओढ्यावर नेण्याची वेळ येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT