कोकण

लाडकी बहीण योजनेसाठी गृहभेट उपक्रम

CD

लाडकी बहीण योजनेसाठी गृहभेट उपक्रम

देवरूख नगरपंचायत : अंगणवाड्यांमध्ये अर्ज भरण्याची सोय

सकाळ वृत्तसेवा

साडवली, ता. ११ : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देवरूखात गृहभेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका, बचतगटांच्या अध्यक्षा यांच्या सभा बोलावून योजनेची जनजागृती करणेच्या उद्देशाने आवश्यक ती सर्व माहिती देऊन अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे.
नगरपंचायत कार्यक्षेत्रामधील १३ अंगणवाड्यांमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी बूथ स्थापन केले असून सदरचे बूथ सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहेत तसेच नगरपंचायत कार्यालयामध्ये कार्यालयीन पूर्ण वेळेसाठी सुट्टीच्या दिवसांसह एक बूथ स्थापन केला आहे तसेच नगरपंचायतीचे वॉर्ड अधिकारी व अंगणवाडी सेविका या ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याचे काम बूथवर करत आहेत. त्याचप्रमाणे गृहभेटी देऊन गृहभेटीद्वारे जनजागृती करणे व अर्ज भरून घेणे हा उपक्रम नगरपंचायतीद्वारे राबवण्यात येत आहे. पात्र लाभार्थींना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणच्या बूथवर तसेच गृहभेटीदरम्यान त्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे तसेच अधिकाधिक पात्र लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे. नोडल अधिकारी श्रीमती भाटकर व सहाय्यक नोडल अधिकारी सरवदे हे या योजनेच्या अंमलबजावणीकरिता बुथनिहाय कामाचा तसेच गृहभेट उपक्रमाचा दैनंदिन आढावा घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT