कोकण

रत्नागिरी- नवीन भाजीमार्केटवर हातोडा कोर्टाच्या निर्णयानंतर

CD

rat11p24.jpg
96377
रत्नागिरी ः अत्यंत धोकादायक बनलेली नवीन भाजीमार्केटची इमारत.

rat11p25.jpg
96378
काही धोकादायक भाग व खोकी पालिकेने गुरुवारी हटवली.

भाजीमार्केटवर न्यायालय निर्णयानंतर कारवाई

इमारत धोकादायक, मात्र गाळेधारकांचा विरोध; न्यायालयात आज अंतिम सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : वापरास अत्यंत धोकादायक बनलेल्या नवीन भाजीमार्केटच्या इमारतीवर गुरुवारी (ता. ११) हातोडा पडणार होता. पालिकेच्या मालमत्ता विभागाकडून पोलिस बंदोबस्तात ही कारवाई होणार होती; परंतु गाळेधारकांनी त्याला विरोध केला. हे प्रकरण न्यायालयात आहे. उद्या (ता. १२) त्याची अंतिम सुनावणी आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंगळवारी (ता. १६) पोलिस बंदोबस्तात ही इमारत पाडण्यात येणार असल्याचे पालिका मालमत्ता विभागाने सांगितले. इमारतीतील अतिशय धोकादायक खोकी, काही भाग जेसीबीने पाडण्यात आला. या कारवाईवेळी या भागात गर्दी झाली होती. गाळेधारकांची धावपळ सुरू होती.
शहरातील नवीन भाजीमार्केटची ही इमारत वापरासाठी अत्यंत धोकादायक झाली आहे. ही इमारत कधीही कोसळू शकते. ही इमारत पाडण्यासाठी महाराष्ट्र नगर पालिका, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम १९४ व १९५ अन्वये संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. इमारतीचा वापर करणाऱ्या गाळेधारकांना व नागरिकांना ताकीद देण्यात आली आहे. या इमारतीचा वापर करणे हे त्यंत धोकादायक असून, इमारत कोसळून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास पालिका जबाबदार असणार नाही, अशी नोटीसही पालिकेने बजावली आहे. इमारतीच्या दोन्ही बाजूंना तसा बोर्डही लावला आहे.
पालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात आलेल्या पाहणीमध्ये आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत अतिशय धोकादायक ठरली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून गाळेधाराकंना नोटिसा बजावण्यात येत आहेत; परंतु गाळेधारक न्यायालयात जाऊन पालिकेच्या या कारवाईला स्थगिती आणतात. येथे एकूण ३२ गाळे आहेत; परंतु त्यातील अनेक गाळे पडून आहेत. काही मोजकेच गाळे वापरात आहेत. इमारत धोकादायक असल्याने ती कधीही पडण्याची शक्यता होती. त्यामुळे आज पालिकेच्या मालमत्ता विभागाने ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. पोलिस बंदोबस्त घेऊन तसेच जेसीबी, कर्मचारी घेऊन इमारत पाडण्यासाठी पथक गेले. अतिशय धोकादायक बनलेला काही भाग जेसीबीने पाडण्यात आला. भाजीमार्केटच्या दरवाजाला कुलूप लावण्यात आले; परंतु अजूनही त्या गाळेधारक इतर व्यावसायिक इमारत, गाळ्यांचा वापर करत आहेत. पालिकेची कारवाई सुरू असताना गाळेधारकांनी याला विरोध केला. आम्ही न्यायालयात गेलो आहे. न्यायालयाचा उद्या निर्णय होईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात यावी, अशी विनंती गाळेधारकांनी केली. त्यामुळे तुर्तास ही कारवाई थांबविण्यात आली आहे.
-----------------

कोट...
नवीन भाजीमार्केटची ही इमारत वापरास अतिशय धोकादायक आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर गाळेधारकांनी आपला गाळा खाली करायचा आहे. मंगळवारी (ता. १६) ही इमारत तोडण्याची कारवाई केली जाईल.
- नंदकुमार पाटील, पालिका मालमत्ता विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT