कोकण

नुकसानीचा आकडा ४ कोटीच्या पुढे

CD

नुकसानीचा आकडा ४ कोटींवर
पावसाचा कहर ः आतापर्यंत ४८६ मालमत्तांची हानी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आकडा अजून वाढत आहे. पावणेतीन कोटींवरून तो चार कोटी १२ हजार ३३५ वर पोहोचला आहे. यात एकूण ४८६ मालमत्तांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात ६ जुलैपासून सातत्याने पाऊस पडत आहे. ७ आणि ८ ला अतिवृष्टी झाली होती. यामुळे नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहून वाडी वस्तीमध्ये पाणी घुसले होते. यात जिल्ह्यातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाकडून केले जात आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. घरे पूर्णतः कोसळणे, घरे अर्धवट कोसळणे तसेच मांगर, गोठे आणि दुकान यांचेही नुकसान झाले होते. याचे पंचनामे करण्याचे काम सुरू होते. ७ ला सुमारे २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात झाली होती. ९ ला तीन कोटी ८६ लाखांची नोंद झाली होती. आता दोन दिवसांत हा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे.
आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यात १२ पक्की घरे पूर्णतः कोसळल्याची नोंद झाली आहे. यात दोडामार्ग तालुक्यातील एका घराचे ६ लाख, कुडाळ तालुक्यातील ११ घरांचे ९८ लाख ९८ हजार रुपयांचे अशी एकूण एक कोटी ४ लाख ९८ हजार रुपयांचे पक्क्या घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील एका पक्क्या घराचे अंशतः ९० हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. २६१ अंशतः पक्की घरे कोसळली आहेत. यात २ कोटी १३ लाख १० हजार ३४० रुपयांची नुकसानी झाली आहे. यामध्ये दोडामार्ग १४ घरे एक लाख ८५ हजार ७५०, सावंतवाडी तालुक्यात २६ घरांचे ४ लाख ३६ हजार ५०० रुपयांचे, वेंगुर्लेत १० घरांचे दोन लाख ८६ हजार ९०० रुपयांचे, कुडाळात १४८ घरांचे एक कोटी ८२ लाख ७० हजार ७६५ रुपयांचे, कणकवलीत १७ घरांचे चार लाख ९६ हजार ६५० रुपयांचे, देवगडात ३८ घरांचे १५ लाख ३९ हजार ७७५ रुपयांचे, वैभववाडीत ८ घरांचे ९४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. ११३ अंशतः कच्च्या घरांचे १९ लाख ३ हजार ४१५ रुपयांचे नुकसान झाले आहे. यात दोडामार्गात आठ घरांचे एक लाख २० हजार ७०० रुपये, कुडाळात १८ घरांचे ४ लाख ५२ हजार ३९०, मालवणात ८७ घरांचे १३ लाख ३० हजार ३२५. देवगडात चार आणि वैभववाडी तालुक्यातील एक अशा पाच गोठ्यांचे ६१ हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले आहे. १५ मांगराचे ५ लाख ५६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, तर ७९ दुकानांचे ७४ लाख ९६ हजार ४७० रुपयांचे नुकसान झाले आहे. यात मालवणात दोन दुकानांचे ३५ हजार रुपयांचे आणि कणकवलीत ७७ दुकानांचे ७१ लाख ४६ हजार ४७० रुपयांचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT